Passengers : हा तर विसरभोळेपणाचा कहर! बायकोचा पडला विसर, टीव्ही, कमोडची उशीरा आली आठवण

Passengers : विसरभोळेपणा हा कधी कधी गंमतीचा, चेष्टेचा विषय ठरतो. पण देशातील या चार शहरातील प्रवासी काय काय विसरु शकतात, याचा अहवाल मनोरंजन करणारा असला तरी धक्का देणारा आहे.

Passengers : हा तर विसरभोळेपणाचा कहर! बायकोचा पडला विसर, टीव्ही, कमोडची उशीरा आली आठवण
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 8:26 PM

नवी दिल्ली : विसरभोळेपणावर (Forgetfulness) कोणतेच औषध नाही. पुरुषांच्या विसरभोळेपणाचे किस्से तर तुम्ही ऐकलेच असेल. शॉपिंग मॉलमध्ये, सराफा बाजारात ते अनेकदा बायकोलाच विसरुन थेट घरी येतात. अथवा कुठल्या तरी कामासाठी परस्पर निघून जातात, हे अनेकदा आपण ऐकले असेलच. पण देशातील या चार मेट्रो शहरातील (Metro Cities) प्रवाशी काय काय विसरले याची एक भली मोठी लांबलचक यादी उबेर (Uber) या कंपनीने समोर आणली आहे. टीव्ही, कमोड, मोबाईल आणि इतर इतक्या किंमती वस्तू लोक विसरले की विचारता सोय नाही. कोणी बायको टॅक्सीत विसरले की नाही, या मिश्किल प्रश्नाचे उत्तर कंपनीने दिले नसले तरी, प्रवाशी काय काय विसरले हे मात्र कंपनीने समोर आणले आहे.

Lost And Found List तर उबेरने हरवलं-सापडलं, अशी एक यादी तयार केली. तिचा अहवाल सादर केला. यामध्ये प्रवाशी टॅक्सी, कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरेल. कोणत्या दिवशी सर्वाधिक वस्तू विसरल्या जातात. त्याची वेळ अशा तपशीलाचा एक छान अहवालच तयार केला आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांच्या विसरभोळेपणाचा एक ताजा अहवालाच समोर आला आहे. काय आहे या अहवालात…

शनिवार हा घात वार

हे सुद्धा वाचा
  1. शनिवारी प्रवाशी सर्वाधिक वस्तू विसरत असल्याचे अहवाल सांगतो. त्यानंतर रविवार आणि शुक्रवारचा क्रमांक लागतो
  2. आयफोनपेक्षा ॲंड्रॉईड मोबाईल विसरण्याचे प्रमाण तिप्पट असल्याचे दिसून आले
  3. लाल रंगाच्या वस्तू सर्वाधिक विसरल्या गेल्याचे हा अहवाल सांगतो
  4. संध्याकाळी जवळपास 7 वाजेच्या आसपास सर्वाधिक वस्तू विसरल्याचे अहवालात नमूद आहे

या 10 वस्तू प्रवाशी विसरले

  1. टीव्ही
  2. वेस्टर्न कमोड
  3. तीन पॅकेट दूध आणि पडदे
  4. केरसुणी
  5. महाविद्यालयाचे प्रवेशपत्र
  6. काठी
  7. इंडक्शन स्टोव्ह
  8. फॅमिली कोलाज
  9. हेवी मशीनरी
  10. प्रिंटेड ‘दुपट्टा (स्कार्फ)

10 सर्वात जास्त विसरणाऱ्या वस्तू

  1. मोबाईल
  2. लॅपटॉप बॅग
  3. वॉलेट
  4. कपडे
  5. हेडफोन
  6. पिण्याच्या पाण्याची बाटली
  7. चष्मा, सनग्लास
  8. किल्ली
  9. दागिने
  10. घड्याळ

5 रंगांच्या वस्तू विसरल्या

  1. 1. लाल
  2. 2. निळा
  3. 3. पिवळा
  4. 4. रोझ
  5. 5. गुलाबी

असे मिळविता येते सामान

  1. उबेरच्या ॲपमध्ये जा
  2. मेन्यू आयकॉनवर टॅप करा
  3. युअर ट्रिपवर क्लिक करा, ट्रिप सलेक्ट करा
  4. रिपोर्ट एन इश्यू विथ धिस ट्रिप, यावर टॅप करा
  5. आय लॉस्ट ॲंन आयटम हा पर्याय निवडा
  6. कॉन्टॅक्ट माय ड्रायव्हर अबाऊट अ लॉस्ट आयटम वर क्लिक करा
  7. नंतर तुमचा तपशील द्या
  8. पडताळणीनंतर तुमची वस्तू परत करण्यात येईल

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...