Video: कुत्र्यासोबत लपाछपी खेळत होती चिमुरडी, मग कुत्र्याने काय केले ते पाहून…
Video: कुत्रा चिमकुलीसोबत खेळतोय लपाछपी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा लहानपणाची आठवण...
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ (Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे 25 सेकंदाचा तो व्हिडीओ अनेकांच्या पसंतीला पडला आहे. अनेकांनी व्हिडीओ वारंवार पाहिल्याचे सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे. Buitengebieden यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ज्यावेळी कुत्र्याला चिमुकली काही नियम सांगत असते तो क्षण पाहण्यासारखा आहे. कुत्र्याला (Dog) नियम समजल्यानंतर तो करतो पाहा.
संबंधित व्हिडीओत दिसत असलेल्या पाळीव कुत्र्याचं नाव मंकी आहे. चिमुकलीला मंकीसोबत लपाछपी खेळायची आहे. त्यामुळे ती कुत्र्याला आदेश देते की, तु लपून बस्सं…त्यानंतर म्हणते आता मला शोध…मंकी नावाचा कुत्रा लहान मुलांसारखा त्या चिमुकलीला शोधू लागतो. शोधून काढल्यानंतर तो समोर घेऊन येतो. हे तुम्हाला व्हिडीओ पाहा म्हणजे लक्षात येईल.
त्या व्हिडीओला सोशल मीडियावर लपाछपी खेळत असल्याचं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच तो व्हिडीओ 1.1 मिलियन लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे दोघांमध्ये असलेली बॉन्डिंग लोकांना अधिक आवडली आहे.
Playing hide and seek.. ? pic.twitter.com/iNN6fX2bIE
— Buitengebieden (@buitengebieden) December 23, 2022
त्या व्हिडीओला 3 हजार लोकांनी पुन्हा शेअर केले आहे. विशेष म्हणजे 43 हजार पेक्षा जास्त लाईक आल्या आहेत.