Video: माणसाने रिक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल बनवला, अशी क्रिएटिविटी पाहिली आहे का ?
Viral Video | एका व्यक्तीने रिक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महल बनवल्यामुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. रिक्षाच्यावरच्या बाजूला सगळी डिजाईन केली असल्यामुळे अनेकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.
मुंबई : आपण अनेकदा रिक्षाने प्रवास करीत असतो. रिक्षा (auto rickshaw) अनेकदा आपल्याला वेगळ्या रंगात रुपात पाहायला मिळते. रिक्षामधील साऊंडसिस्टीम अधिक लोकांना आवडते. अधिकतर रिक्षावाले आपल्या वाहनांना वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने बदल करीत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Castle Auto Video) महल तयार करण्यात आला आहे. तो महल अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, लोकांना हा सगळीकडे सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे.
भारतात अशा टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे. कमी कालावधीमध्ये अधिक काम करणारी लोकं सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. चांगले व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती राठोड गजानन नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, तो महल तयार करण्यासाठी कितीवेळ लागला असेल. तुम्ही रिक्षा चारही बाजूनी पाहा म्हणजे तुमच्या कामाचं स्वरुप लक्षात येईल. ही रिक्षा अनेकांचं लक्ष खेचत आहे. त्याचबरोबर जिथं ही रिक्षा लागते तिथं लोकं हे सगळं पाहण्यासाठी गर्दी करतात असं पाहायला मिळालं आहे.
View this post on Instagram
व्हिडीओला आतापर्यंत 4.3 लाख लोकांनी पाहिलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्यापासून लोकं रिक्षाच्या मालकाची आणि अशी अनोखी क्रिएटीव्हिटी करणाऱ्या व्यक्तीची जाम तारिफ करीत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 4.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढत आहे. नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओला चांगल्या कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.