Video | हॉटेलमध्ये छेड काढली, त्या पुरुषाला महिलेने तिथचं धुतला, व्हिडीओ पाहिल्यानंतर…
Viral Video | एक महिला छेड काढणाऱ्या व्यक्तीला परेशान झाली होती. त्यानंतर त्या महिलेने त्या इसमाला कशापद्धतीने शिक्षा दिली आहे, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. व्हायरल व्हिडीओमध्ये लोकांनी त्या महिलेची अधिक तारीफ केली आहे.
मुंबई : अनेकदा महिलांना काही विकृत पुरुषांकडून छेडछाड (Eve Teasing Trending Video) केली जाते. पुरुषांकडून छेडछाड करण्याची ठिकाणं एकतर गर्दीची असतात किंवा निर्जन स्थळ निवडलं जातं. काही महिला अशा ठिकाणाहून सुरक्षित बाहेर पडतात. काही घाबरुन आरडा-ओरडा करायला सुरुवात करतात. काही महिला पोलिसांना अशा प्रकारची घटना त्वरित सांगतात. सध्या सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) एक व्हिडीओ (VIRAL VIDEO) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेने छेड काढणाऱ्या पुरुषाची काय अवस्था केली आहे, हे तुम्हाला पाहायला मिळेल.
व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. महिलेची छेड काढणाऱ्या त्या व्यक्तीचा काय अवस्था झाली आहे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एक महिला एका हॉटेलमध्ये बसून जेवण करीत आहे. त्यावेळी मागून जाणाऱ्या व्यक्तीने त्यांना चांगलचं डिवचलं आहे. महिलेला ज्यावेळी राग येतो, त्यावेळी ती महिला त्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात करते. ती महिला विकृत व्यक्तीला पकडून-पकडून मारहाण करीत आहे. मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
Woman beats the brakes off man who inappropriately touched her ? pic.twitter.com/5av2zMWmat
— CCTV IDIOTS (@cctvidiots) May 2, 2023
महिलेने पुरुषाला जाम धुतला
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला एका पुरुषाला जाम मारहाण करीत आहे. विशेष म्हणजे त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळत आहे. त्या पुरुषाला पकडून-पकडून मारहाण केल्यामुळे अनेकांनी त्या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्यावेळी तिथं एक महिला येते आणि त्या पुरुषाला सोडण्यासाठी सांगत आहे. पण पीडीत महिला आरोपीला बुक्क्यांनी मारहाण करीत आहे. ती त्या महिलेचं अजिबात ऐकत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.