घरात घुसला कोब्रा, वाचवण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रावरच करतोय हल्ला, पाहा Viral Video
कोब्रा (Cobra) या सापाचं नाव ऐकताच मनात भीती निर्माण होते. सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाला वाचवताना (Rescue) दिसत आहे. सापाला सोडवण्यासाठी एका व्यक्तीला बोलावण्यात आलं होतं. जेव्हा सर्पमित्र सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सापाला राग येतो आणि साप आपला फणा उचलू लागतो.
Shocking Snake Video : सापाशी संबंधित अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. सोशल मीडियावरही असे व्हिडिओ लवकर व्हायरल होत असतात. सापाशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. त्याशिवाय माहितीच्या हेतूनंही अनेक व्हिडिओ अपलोड केले जातात. ते पाहून आपण सापाशी संबंधित माहिती मिळवू शकतो आणि सावध राहू शकतो. तर काही व्हिडिओ भिती निर्माण करणारे असतात. कोब्रा (Cobra) या सापाचं नाव ऐकताच मनात भीती निर्माण होते. सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाला वाचवताना (Rescue) दिसत आहे. सापाला सोडवण्यासाठी एका व्यक्तीला बोलावण्यात आलं होतं. जेव्हा सर्पमित्र सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सापाला राग येतो आणि साप आपला फणा उचलू लागतो.
सर्पमित्रावरच हल्ला
या व्हायरल व्हिडिओमध्ये कोब्रा वाचवणाऱ्यावर अनेकदा साप हल्ला करत असल्याचं दिसून येतं. पण सर्पमित्रानं धाडस आणि सतर्कता दाखवून अखेर सापाला ताब्यात घेण्यात यश मिळवलं. सापाला पकडल्यानंतर त्याच्या घरी म्हणजेच जंगलात नेऊन सोडलं जातं. या पकडलेल्या सापालाही जंगलात सोडून देण्यात आलं. पण तिथं असलेल्या लोकांची भितीनं गाळण झाली होती.
Watch as this snake handler in India carefully outwits a giant spectacled cobra, ultimately relocating it safely into the wild ? pic.twitter.com/z0KtDzTl86
— NowThis (@nowthisnews) January 22, 2022
सर्वात धोकादायक
कोब्रा हा जगातला सर्वात धोकादायक आणि विषारी सापांपैकी एक आहे. कोब्राला नागराज म्हणूनही ओळखलं जातं आणि हा जगातला सर्वात लांब विषारी साप आहे. सापांची ही प्रजाती आग्नेय आशिया आणि भारताच्या काही भागात सर्वाधिक आढळते. कोब्रा भारतात धार्मिकदृष्ट्याही प्रसिद्ध आहे. भारतात याला भगवान शिवाच्या गळ्यात राहणारा साप मानला जातो आणि त्यामुळेच भारतात या धोकादायक सापाला लोक मारत नाहीत.
आणखी वाचा