Viral : ‘हे’ Aadhar Card नाही, लग्नपत्रिका आहे! छत्तीसगडच्या ‘या’ नवरदेवानं बनवलं अनोखं डिझाइन
Wedding invitation card : लग्नसराईत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निमंत्रण पत्रिका(Invitation card). छत्तीसगड(Chattisgarh)मधील जशपूर येथील रहिवासी असलेल्याने आधार कार्ड(Adhar Card)च्या धर्तीवर लग्नपत्रिका छापली आहे.
Wedding invitation card : लग्नसराईचा हंगाम सध्या सुरू आहे. अशा स्थितीत अनेकांची लग्ने होतात. यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निमंत्रण पत्रिका(Invitation card), ज्याला आपण लग्नाची पत्रिका म्हणतो. फॅन्सी, विविध डिझाइन्सच्या पत्रिका आपल्याला या काळाता पाहायला मिळतात. काही तर अशा डिझाइन्स असतात, ज्या लोकांना खूप आवडतात. अलीकडे एका व्यक्तीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ही व्यक्ती छत्तीसगड(Chattisgarh)मधील जशपूर येथील रहिवासी असून, आधार कार्ड(Aadhar Card)च्या धर्तीवर त्याने लग्नपत्रिका छापण्यात आली आहे. जशपूर जिल्ह्यातील अंकिरा गावात राहणाऱ्या एका तरुणाने आधार कार्डच्या स्टाईलमध्ये लग्नपत्रिका छापली आहे. या कार्डमध्ये लग्नाशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यात आली आहे. कार्डमध्ये आधार क्रमांकाऐवजी लग्नाची तारीख लिहिली आहे, त्यासोबत बारकोडही देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर चर्चा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या वेगळ्या प्रकारची लग्नपत्रिका सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आधार कार्डासारखी दिसणारी लग्नपत्रिका जशपूर जिल्ह्यातील फरसाभर ब्लॉकमधील अंकिरा गावातील लोहित सिंग नावाच्या तरुणाची आहे. लोहित सिंह अंकिरा गावात एक जनसेवा केंद्र चालवतात, जिथे लोकांचे आधार कार्ड बनवले जाते. यासोबतच लोहित सिंग इंटरनेट, छपाई, फोटो कॉपी आणि लग्नपत्रिका छपाईचे काम करतात.
डिजीटलसाठीचे डिझाइन
महत्त्वाची बाब म्हणजे, आधार कार्डचे हे डिझाइन फक्त डिजीटलसाठीच वापरण्यात आले आहे. लग्नपत्रिका मात्र वेगळ्या स्वरुपात असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या काळातही लग्नादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या लग्नपत्रिका पाहायला मिळाल्या होत्या. कोरोनाच्या काळात प्रत्येक जागरूक व्यक्तीने लग्नपत्रिकेत येणाऱ्या पाहुण्यांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले होते. ज्याचे खूप कौतुकही झाले. आता आधार कार्डच्या डिझाइनची लग्नपत्रिका चर्चेत आहे.