माकडचाळे नेमके काय असते, मुलीने घेतली याची प्रचिती; व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल

प्राणीसंग्रहालयात गेलेल्या मुलीने वास्तवात माकडाला फक्त खाऊ दिले नव्हते तर तिने त्याआधी माकडाशी खूप मस्तीही केली होती. ती मस्ती करणे त्या मुलीच्या चांगलेच अंगलट आले.

माकडचाळे नेमके काय असते, मुलीने घेतली याची प्रचिती; व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल
माकडाचा मुलीचे केस ओढतानाचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: NDTV
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 11:20 PM

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बरेच जण गार्डन किंवा प्राणीसंग्रहालयाला भेट देतात. प्राणीसंग्रहालयाला भेट देताना अनेक जण आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन जातात. अशावेळी जर तुमच्या सोबतीला तुमची लहान मुले असतील तर त्यांना प्राण्यांपासून दूर ठेवा. हे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे सोशल मीडियामध्ये गेल्या काही दिवसांत व्हायरल झालेला माकडाचा व्हिडिओ (Monkey Video Viral). या व्हिडिओमध्ये माकडचाळे नेमके काय असते, याची प्रचिती आवर्जून येत आहे. एक मुलगी माकडाला खाऊ द्यायला (Give food to Monkey) हात पुढे करते. त्यावेळी माकड तिच्या हातातील खाऊ खेचण्यावरच थांबला नाही तर त्या माकडाने थेट मुलीच्या केसांना (Girls Hair) हात घातला आणि जोरजोरात केस ओढू लागला. यादरम्यान माकडाच्या तावडीतून मुलीची सुटका करून घेताना सगळ्यांच्याच नाकीनाऊ आले.

माकडाशी मस्ती करणे पडले महागात

प्राणीसंग्रहालयात गेलेल्या मुलीने वास्तवात माकडाला फक्त खाऊ दिले नव्हते तर तिने त्याआधी माकडाशी खूप मस्तीही केली होती. ती मस्ती करणे त्या मुलीच्या चांगलेच अंगलट आले. चवताळलेल्या माकडाने तिच्या केसांना जोरात झटके देत आपला इंगा दाखवला.

मुलगी माकडाच्या हातातील आपले केस सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न करते. पण त्यात तिला सहजासहजी यश मिळत नाही. मग आसपासचे लोक जमा होतात आणि माकडाला घाबरवत त्याला मुलीचे केस सोडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात.

बराच वेळ ही प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते. मात्र बरेच जण माकड चाळ्यापुढे अक्षरशः गुडघे टेकतात, काहीजण प्रयत्नांमध्ये हार मानून माकडापुढे हात जोडतात. हा सगळा थरार पाहून व्हिडिओ देखील सर्वांच्या काळजात धस्स करीत आहे.

व्हिडिओमुळे सगळेच जण होतात अलर्ट

माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला आहे. या मागचे कारण म्हणजे हा व्हिडिओ सर्वांनाच सतर्कतेचा सल्ला देत आहे. माकड हा प्राणी कधी कसा वागेल याचा नेम नसतो. त्यामुळे शक्यतो प्राणीसंग्रहालयात गेल्यानंतर त्याच्याशी किती जवळीक साधायची, याची पुरेशी खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओतून बरेच जण हा संदेश आपल्या मनाशी जपून ठेवत आहेत. बऱ्याच जणांनी ट्विटरवरील व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्याचवेळी इतरांना सतर्क करण्यासाठी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.