Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mother Daughter video viral : अभ्यासाच्या नावाखाली मुलीचे प्रताप; मग आई असं काहीतरी करते, की…

Mother Daughter funny video : सोशल मीडिया(Social media)च्या या विश्वात मजेदार व्हिडिओ आपल्याला आवडत असतात.

Mother Daughter video viral : अभ्यासाच्या नावाखाली मुलीचे प्रताप; मग आई असं काहीतरी करते, की...
मुलगी अभ्यास करते की नाही, हे पाहण्यासाठी आलेली आई
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:30 AM

Mother Daughter funny video : सोशल मीडिया(Social media)च्या या विश्वात आपण गुरफटून गेलो आहोत. इथे दररोज हजारो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात, आपल्याला हसवतात, आपल्याला शिकवतात तसंच भावुकही करतात. मजेदार व्हिडिओ तर सदासर्वकाळ आपल्याला आवडत असतात. सध्या परीक्षेचा काळ आहे. एकतर कोरोनानं हैराण केलंय. त्यात परीक्षा (Exams) ऑफलाइन की ऑनलाइन यावर वाद सुरू झालाय. पण काही का असेना, अभ्यास तर करावा लागणारच. कधी कधी विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच जास्त काळजी असते. मग ते आपल्या मुलांच्या मागे लागतात. ते अभ्यास करतात की नाही, यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. आता असाच एक गंमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालाय. जो पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

आईचा मोर्चा मुलीच्या रूमकडे

एक मुलगी तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते. अर्थात कॉलेजमध्ये जाणारी असल्यामुळे ती अभ्यासाच्या नावावर काय करते, याचा विचार तुम्ही करत असाल. हाच विचार तिच्या आईच्याही मनात येतो. मग मुलगी खरंच अभ्यास करते का हे पाहण्यासाठी आई आपल्या मुलीच्या रूमकडे मोर्चा वळवते. दार उघडून जोरात खेकसते की काय करतेस? त्यावर मुलगी शांतपणे म्हणते, की माझ्यावर तुझा विश्वास नाही. असं असेल तर मी अभ्यास कसा करू शकेन. असं म्हणत आईला तिथून जायला सांगते.

यूट्यूबवर अपलोड

आईच्या शंकेचं निरसन मात्र होत नाही, रूममधून बाहेर जाण्याआधी आई असं काहीतरी करते, की मुलीचं पितळ उघडं पडतंच. हा मजेदार व्हिडिओ यूट्यूबवर लिटलग्लोव्ह (LittleGlove) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. 8 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला जवळपास 1.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात सातत्यानं वाढ होतेय. ‘Exam ka Fever aur maa ka prakoop‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. (Video Courtesy – LittleGlove)

आणखी वाचा : 

Video Virao : तीन मजले चढतो फक्त 15 सेकंदांत! यूझर्स म्हणतायत, ही तर Spidermanला टक्कर

पेरू खाण्याचं ‘हे’ अजब चॅलेंज स्वीकारणार का? पाहा ‘हा’ Viral झालेला Funny Video

Stunt Viral Video : स्टंटबाजीची हवी डोक्यात गेली की ‘असं’ हसं होतं! 4 सेकंदांत जाणून घ्या Helmetचं महत्त्व

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.