VIDEO | एका व्यक्तीने दावा केला की, प्रत्येकाला 7 वडील असतात, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल
सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बोलत असलेल्या व्यक्तीने सगळ्यांना सात बाप असतात असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा हसू येईल.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज नवे व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, त्याची चर्चा सुरु होते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांना हसू कंट्रोल होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने दावा केला आहे, की प्रत्येकाला ‘सात बाप’ असतात. त्याचबरोबर ती व्यक्ती मोजून सुध्दा दाखवत आहे. हे सगळं ऐकत असताना लोकांना हसू आवरेना झालंय. तुम्हाला खरं वाटतं नसेल, तर तुम्ही सुध्दा हा व्हिडीओ (trending viral video) पाहा आणि कमेंटमध्ये आम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते सांगा.
सात बाप असल्याचा केला दावा
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ उत्तरप्रदेश राज्यातील फिरोजाबाद राज्यातील असल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. पानपट्टीत बसलेला एक व्यक्ती दावा करीत आहे की, सगळ्यांना सात बाप असतात. त्याचबरोबर ती व्यक्ती सात बाप मोजून देखील दाखवत आहे. सात बापाला हा म्हणणार आहे का तुम्ही ? व्हिडीओमध्ये तुम्हाला तो व्यक्ती सांगत आहे. सगळ्यांचा बाप वरती बसला आहे. दुसऱ्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं आहे. तुमच्या बायकोच्या बापाला तुम्ही काय म्हणणार आहात…पापा जी, सर्वात मोठी वेळ, जर वेळ वाईट असेल तर चांगले अपयशी ठरतात. पाचवे पिता म्हणून ते महात्मा गांधींचे नाव घेताना दिसतात. यानंतर ती व्यक्ती म्हणते, गाय ही आपली माता असल्याने बैलाला बाप म्हणू शकतो. तर वेळ आली की गाढवालाही बाप बनवावा लागतो. हे सगळं त्या व्हिडीओत दिसत असलेल्या व्यक्तीचं मतं आहे.
View this post on Instagram
लोकांच्या मजेशीर कमेंट
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 50 लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. 4 लाख 27 हजार लोकांना या व्हिडीओ लाईक केले आहे. हा व्हिडीओ १० मेला शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला पाहून युजर्स चांगल्या आणि वाईट कमेंट करीत आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून राग व्यक्त केला आहे. काहीजण हा व्हिडीओ पाहून फक्त हसत आहेत.