VIDEO | गढूळ पाण्यात बुडून मासे पकडतोय, असं टॅलेंट खूप कमी पाहायला मिळतं
Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती गढूळ पाण्यात डुबकी मारुन मासे पकडत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Shocking Viral Video) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या शैलीने मासे (fish catching) पकडताना दिसत आहे. अनेकजण गावाकडं नदी किंवा तलावात मासे पकडतात. मासे पकडण्यासाठी काही लोकं जाळ्यांचा उपयोग करतात. परंतु सध्याचा व्हायरल व्हिडीओ (viral video) अनेकांना धक्का देणारा आहे. त्या व्यक्तीकडं कसल्याही प्रकारचं जाळ नाही. त्याचबरोबर ती व्यक्ती ज्या ठिकाणी मासे पकडत आहे. त्या ठिकाणी गढूळ पाणी आहे. त्या व्यक्तीची मासे पकडण्याची स्टाईल पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
हाताने मासे पकडत आहे
खरंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती हाताने मासे पकडत आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. असं टॅलेंड खूप कमी लोकांकडं असतं. अशा पद्धतीने मासे सापडत नाही. त्याचबरोबर मासे पकडण्यासाठी खूपवेळ वाया जातो असं पाहण्यात आलं आहे. हा व्हिडीओ लोकांना आवडल्यामुळं त्यांनी सुध्दा शेअर केला आहे.
हाताने मासे पकडले
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. तो व्हिडीओ इंस्टाग्रामवरती balikvideolari नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती गढूळ पाण्यात मासे पकडण्यासाठी उतरला आहे. सगळीकडं गढूळ पाणी असताना ती व्यक्ती पाण्यात बुडते आणि काहीवेळाने बाहेर येते. त्यावेळी त्या व्यक्तीच्या हातात मासे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ती व्यक्ती माशांना तलावाच्या बाहेर फेकत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांना व्हिडीओ आवडला
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर अधिक कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ आठ लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर दोन हजारपेक्षा अधिक लोकांना लाईक केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ विविध प्रकारच्या कमेंट आल्या आहेत.