VIDEO : पोलिस लागले गाडीच्या पाठीमागे, चालकाने केला स्टंट, व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा सुध्दा घाबरले, म्हणाले…
व्हिडीओ शेअर करीत असताना, आनंद महिंद्रा यांनी "नाही, हे नवीन SUV साठी आमच्या चाचणी मानकांचा भाग होणार नाही!"
मुंबई : सोशल मीडियावर कायम व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) होत असतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात किंवा धक्कादायक असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका गाडीचा पाठलाग पोलिस (POLICE) करीत आहेत. हा व्हिडीओ कोणत्या भागातील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडीओ चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्याचबरोबर आवडलेल्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यासमोर आणतात. सध्या त्यांनी एक असाचं व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
व्हिडीओ शेअर करीत असताना, आनंद महिंद्रा यांनी “नाही, हे नवीन SUV साठी आमच्या चाचणी मानकांचा भाग होणार नाही!”
व्हिडीओमध्ये एक मर्सिडीज जी-वैगन या गाडीचा पाठलाग करीत असताना, ती गाडी एका गाडीच्या साहाय्याने पलिकडच्या रस्त्यावर हवेत उडाली आहे. ज्यावेळी मर्सिडीज जी-वैगन ही जोरात वेगाने येते, त्याचवेळी समोर असलेल्या ट्रेलरला मागच्या बाजूने जोराची धडक देते. त्यानंतर मर्सिडीज जी-वैगन ही गाडी हवेत उडली जाते आणि गोल फिरुन पलीकडे सुरक्षितरीत्या उतरली जाते. ती गाडी उतरल्यानंतर अनेकांना असं वाटतंय की, काहीचं झालेलं नाही. त्यावेळी पोलिस गाडी सुध्दा तिथं पोहोचते. परंतु पोलिस चालक गाडीला ताब्यात ठेवतो.
हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. त्यावर अनेकांना प्रतिक्रिया लिहील्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, हा सिंगम चित्रपटातील तर सीन नाही ना ? दुसऱ्या एकाने हा सिंगम तीन मधील सीन आहे का ? तिसरा नेटकरी म्हणतोय, हा खरंचं रीअर हीरो आहे. आणखी एकाने मला बॉलिवूडमध्ये असं पाहायचं आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुध्दा अशा प्रकारची प्रतिक्रिया लिहा.
पत्रकार मोहम्मद जुबेर यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी केलेल्या अॅनिमेशनचे स्पष्टीकरण देणारी YouTube व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. क्रिएटरने 2020 मध्ये रस्त्यावरील एका पुलावरून ट्रॅफिक व्हिज्युअल कॅप्चर करण्यास सुरुवात केली आणि अॅनिमेशन वापरून, क्रिएटरने पोलिस कार, ट्रेलर आणि SUV सह संपूर्ण पोलिसांचा पाठलाग तयार केला.