Viral Video | खाकी वर्दीतील LOVE STORY पाहीलीय का ? प्री-वेडींग शुट झाले व्हायरल

लग्नाचे प्री-वेडींग शुट तुम्ही अनेकदा पाहीले असेल. परंतू पोलीस कपलने केलेले प्री-वेडींग शुट इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहे. त्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया यूजर व्यक्त करीत आहेत.

Viral Video | खाकी वर्दीतील LOVE STORY पाहीलीय का ? प्री-वेडींग शुट झाले व्हायरल
pre wedding shootImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 7:58 PM

नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : पोलीस दलातील माणसांच्या खाकी वर्दीतही सर्वसामान्य माणसेच दडलेली असतात. त्यांच्या कठोर मनातही प्रेमाचा झरा वाहतच असतो. प्रत्येकाची एक प्रेमकहाणी असते. काही प्रेमकहाण्या वाचायला लोकांना खूपच आवडते. त्यामुळे पडद्यावरही प्रेमकहाणी असलेले चित्रपट आवडीने पाहिले जातात. अशीच एक प्रेमकहाणी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही प्रेम कहाणी हैदराबादच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांची आहे. हा एक प्री-वेडींग व्हिडीओ असून त्यावर अनेक युजर्स प्रतिक्रीया आल्या आहेत.

प्री-वेडींग व्हिडीओत सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्याची डॅशिंगमध्ये एण्ट्री होताना दाखविली आहे. व्हिडीओग्राफरने एकदम अनोख्या शैलीत हे फोटोशूट केले आहे. स्लो मोशन शॉटने व्हिडीओला रोचक बनविले आहे. काही क्षण असेही असतील कि आपल्याला हा चित्रपट आहे की काय असे वाटू शकेल. त्यांचे रोमॅटीक नृत्य पाहून आपल्याला हसु देखील येईल. व्हिडीओची सुरुवात पुंजागुटा पोलिस स्टेशनात पोलिस कपल आपआपल्या पोलिस वाहनातून उतरत असताना दिसतात. आपल्याला आपण साऊथचा सिनेमा पाहतोय की काय ? असा आपल्याला भास होईल. हे पोलीस कपल व्हिडीओत हैदराबाद येथील आयकॉनिक चार मिनार आदी स्थळांवर फिरताना आपल्याला पहायला मिळत असल्याने हा व्हिडीओ खूपच सुंदर झाला आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

पोलिस कपलच्या या प्री -वेडींग व्हिडीओवर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत. काही व्यक्तींनी पोलिस अधिकाऱ्यांची वैयक्तिक आणि मानवी बाजू पाहून त्यांचे कौतूक केले आहे. तर काहींनी लग्नासारख्या खाजगी बाबीसाठी पोलिस वाहने आणि पोलिस ठाण्याच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. एका युजरने हैदराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. आनंद यांना टॅग करीत प्री-वेडींग शुटसाठी पोलिस ठाण्याचा वापर करणे योग्य आहे का ? असा सवाल केला आहे. अनेक युजर्स त्यांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने म्हटलेय की,’ मी अनेकदा चित्रपटात पोलिस जोडप्याला पाहीले आहे. परंतू हे पहिल्यांदाच पाहीले आहे.’

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.