VIDEO | ही महिला देवाला नवरा समजते, मंदीरात देवाच्या बाजूला बसायचं होत, परंतु…
VIDEO | देवाला नवरा समजून बाजूला बसली होती महिला, पुजाऱ्याने केसाला पकडून मारहाण करीत मंदिरातून बाहेर काढले, मग...
मुंबई : कालपासून सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ (Viral Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काही पुजारी एका महिलेला मंदिरातून (Temple) मारहाण करुन बाहेर काढत आहेत. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी चांगल्या आणि वाईट कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ बेंगलूरुमधील असून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
त्या व्हिडीओत पुजारी आणि इतर व्यक्ती त्या महिलेला मारहाण करुन बाहेर काढत आहेत. तो व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या व्यक्तीची चौकशी होणार आहे.
त्या पीडीत महिलेंच नाव हेमवती आहे. त्या महिलेने अमृतहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही घटना 21 डिसेंबर रोजी घडली आहे. आरोपी मुनीकृष्ण हा अमृतहल्ली परिसरातील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराचा पुजारी आहे.
A Dalit woman is being assaulted and removed from the temple premises in Bangalore, India! pic.twitter.com/RkTiMT4yCe
— Ashok Swain (@ashoswai) January 6, 2023
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, भगवान वेंकटेश्वर माझे पती आहेत असं महिलेचं म्हणणं आहे. त्यामुळे ती महिला मंदीरात देवाच्या शेजारी बसण्याचा हट्ट करीत होती. ज्यावेळी तिला मंदीराच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आलं त्यावेळी पुजाऱ्याच्या तोंडावर थुंकली. त्यानंतर त्या महिलेला पुजारी आणि तिथल्या तीन व्यक्तीनी मारहाण करीत बाहेर काढले.