बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

विशेष म्हणजे बाजारसमितीचा प्रचार करत असताना एका बाजारात धनंजय आणि त्याचे वडील भाजीपाला विकत बसलेले आहेत. हा फोटो देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. धनंजयचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे.

बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास
Market Committee of BeedImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 12:29 PM

महाराष्ट्र : मराठवाड्यातील (marathwada) बीडच्या बाजार समितीमध्ये (Market Committee of Beed) धनंजय गुंदेकर यांचा झालेला विजय अनोखा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शालेय जीवनापासूनच धनंजय गुंदेकर (dhananjay gundekar) यांच्यात लोकचळवळीचे गुण होते. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्याने पत्रकारिता केली, त्यातून बाहेर पडून काही राजकीय व्यक्तींकडे पीए म्हणूनही तो काही काळ राहिला. हे सगळं करताना त्याला त्याच्यातील धडपडणारा कार्यकर्ता स्वस्थ बसू देत नव्हता हेही तितकचं खरं आहे. 2017 ला आंबेसावळी ग्रामपंचायतीत धनंजयने त्याचे पॅनल उभे केले. ते दणकून आपटले. त्या दिवसापासून तर त्याने शासकीय अन्यायाने पिचलेल्या जनमाणसांसाठी स्वतःला झोकून दिले.

बीड तालुक्यात शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. अभ्यासू वृत्तीने स्वतःची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. छोटेसे का होईना पण सामान्यांसाठी लढणारा उमदा युवक अशी छाप पाडली. 2022 ला पुन्हा ग्रामपंचायतला पॅनेल टाकले. यावेळेस गावकऱ्यांनी धनंजयला मनापासून साथ दिली, त्याचे पॅनल निवडून आले. बीड बाजार समिती निवडणूक लढायची घोषणा त्याने केली. पॅनल टाकायची तयारी सुद्धा केली, पण स्थानिक आमदारांनी मध्यस्थी करून महाविकासआघाडी घडवून आणली अन् ग्रामपंचायत सर्वसाधारण सदस्यांमधून धनंजयला उभे केले.

धनंजय गुंदेकर यांच्याकडे असलेल्या लढाऊ बाण्यामुळे सर्व मित्र, सख्या सोबतींची फौज उभी राहिली. आज वयाच्या 28 व्या वर्षी धनंजय बीड बाजार समितीत संचालक म्हणून निवडून गेला आहे. बीड जिल्ह्यातून चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवे उमदे नेतृत्व उभे होतेय हे पाहून अनेकांना आनंद झाला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जो संघर्ष तू रस्त्यावर केला, तसाच न्याय तू त्यांना देशील याची आम्हाला खात्री आहे. खूप आनंद झाला अशा पद्धतीचा मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे बाजारसमितीचा प्रचार करत असताना एका बाजारात धनंजय आणि त्याचे वडील भाजीपाला विकत बसलेले आहेत. हा फोटो देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. धनंजयचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे.

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...