IPL 2023 स्पर्धेतील टीमबाबत राखी सावंत हिने केलं असं विधान, नेटकऱ्यांनी घेतली शाळा Watch Video
ड्रामा क्विन राखी सावंत कधी काय करेल याचा नेम नाही. यावेळी तिने रंगतदार वळणावर आलेल्या आयपीएल स्पर्धेवर भाष्य केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.
मुंबई : ड्रामा क्विन म्हणून ओळख असलेली बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी निमित्त ठरलं ते आयपीएल 2023 स्पर्धा. सोशल मीडियावर राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिची शाळा घेण्यास सुरुवात केली आहे. राखी सावंतच्या बेताल वक्तव्याची नेटकऱ्यांना चांगलीच सवय आहे. पण यावेळी तिने आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना फलंदाजीबाबत सल्ला दिला. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
एका पॅपराजी इंस्टाग्राम अकाउंटने राखी सावंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ब्लू मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत पॅपराजीसोबत बोलताना दिसत आहे. इतकंच चक्क हातात बॅट घेऊन फलंदाजी कशी करावी याबाबत सल्ला देत आहे.
व्हिडीओमध्ये राखी सावंत हिने सांगितलं की, “आयपीएल खेळणाऱ्यांनो अशी नाही तर अशी बॅटिंग करा. बघा मी कशी करत आहे.” हा व्हिडीओ पाहून आता नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली मजेशीर आणि खोचक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
एका युजर्सने लिहिलं आहे की, तुला इतकं तरी माहिती आहे का? क्रिकेट खेळण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. आली मोठी शिकवणारी. दुसऱ्या युजर्सने कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, का इतकी ड्रामेबाजी करतेस? तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, आयपीएलचा अर्थ तरी माहिती आहे का? फलंदाजी करायची आहे तर मैदानात येऊन कर मग कळेल.
आयपीएल 2023 स्पर्धा
आयपीएल 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. एका एका सामन्यामुळे गुणतालिकेचं गणित बदलत आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आज कोलकाता नाइट राइडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद अस्तित्वाची लढाई लढणार आहेत.