बाल दो, बुढ़िया के बाल लो..! रस्त्यावरील विक्रेत्याकडून अनोखी Offer, Video viral
Interesting video : इंटरनेटमुळे (Social media) संपूर्ण जगाची ओळख होते. केस (Hair) हा एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या केसांची किंमत (Price) किती आहे हे आम्हाला माहीत नाही. चला तुम्हाला अशाच एका व्हिडिओची ओळख करून देत आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Interesting video : इंटरनेटमुळे (Social media) संपूर्ण जगाची ओळख होते. खरे तर, इंटरनेटमुळे जग आपल्या सर्वांना खूप लहान भासत आहे. इंटरनेटवर, विचित्र ते मनोरंजक गोष्टी, आपण घरी बसून पाहू शकता. इंटरनेटवर काहीही शोधा आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळते. केस (Hair) हा एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकदा केसगळतीमुळे लोक त्रस्त असतात. आंघोळीनंतर बाथरूममध्ये केस गळताना दिसले, की चिंता वाढत. केस वाचवण्यासाठी विविध प्रकारची तेल, शाम्पू आणि औषधे वापरली जातात. जेव्हा हे देखील आराम देत नाही, तेव्हा प्रत्यारोपणही केले जाते. केस गळत असताना ते केस गोळा करण्याऐवजी ते कचऱ्यात टाकतात. त्या केसांची किंमत (Price) किती आहे हे आम्हाला माहीत नाही. चला तुम्हाला अशाच एका व्हिडिओची ओळख करून देत आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
अनोखा स्ट्रीट विक्रेता
एका YouTuber ला कॉटन कँडी विकणारा एक अनोखा स्ट्रीट विक्रेता सापडला. हा रस्त्यावरचा विक्रेता लोकांचे केस घेतो आणि त्या बदल्यात मोफत कॉटन कँडी देतो. आपण अनेकवेळा कॉटन कँडी खाण्यासाठी पैसे देतो, परंतु हे एक वेगळेच उदाहरण आहे.
यूट्यूबरने शेअर केला व्हिडिओ
फूडी विशालने हा मनोरंजक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला आहे. छोट्या क्लिपमध्ये रस्त्याच्या कडेला एक दुकानदार माणसांच्या केसांच्या बदल्यात लहान मुलांना कॉटन कँडी विकताना दिसतो. त्याने सायकलवर पिशवी टाकली आहे आणि तो माणसांचे केस गोळा करतो.
किंमत आहे केसांना
खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये या कँडीला ‘बुढ़िया के बाल’ असेही म्हणतात. कॉटन कँडी मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि लोकांना ती खायला खूप आवडते. यूट्यूबरने या केसांचे काय करतो, असे विचारले असता त्याने सांगितले, की ते केस 3 हजार रुपये प्रतिकिलो दराने विकतात. हे केस विग बनवण्यासाठी वापरतात.