खतरनाक बदला..! पैसे मागितले म्हणून तरुणाचा तिघांनी ‘असा’ घेतला सूड, Funny Video Viral

सोशल मीडिया(Social Media)वर अनेक विनोदी (Funny) व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण एक म्हण ऐकली असेल जशास तसं... असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. जशास तसं या प्रकारातला हा व्हिडिओ आहे. काहीशा विनोदी शैलीतला हा व्हिडिओ यूझर्स आवडीनं पाहतायत सोबतच शेअरही करतायत.

खतरनाक बदला..! पैसे मागितले म्हणून तरुणाचा तिघांनी 'असा' घेतला सूड, Funny Video Viral
तरुणाचा तिघा मित्रांनी घेतला बदला
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 5:45 PM

Short comedy video : सोशल मीडिया(Social Media)वर अनेक विनोदी (Funny) व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण एक म्हण ऐकली असेल जशास तसं… आपण एखादं काम करतो. पण त्यावर दुसरा काहीतरी वेगळंच सांगतो. मग ऐकलं नाही तर बदल्याची भावना तयार होते. आता या विषयावरही व्हिडिओ तयार नाही झाले तरच नवल. विनोदी व्हिडिओंसह बराच कंटेंट आपल्याला सोशल मीडियावर पाहायला, ऐकायला मिळतो. आपलं यामुळे मनोरंजन (Entertainment) तर होतंच. शिवाय बऱ्याच व्हिडिओतून काहीतरी शिकायलाही मिळतं. काही व्हिडिओ त्यातल्या कंटेंटमुळे व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. जशास तसं या प्रकारातला हा व्हिडिओ आहे. काहीशा विनोदी शैलीतला हा व्हिडिओ यूझर्स आवडीनं पाहतायत सोबतच शेअरही करतायत.

तीन मित्रांची कहाणी

तीन मित्र असतात. ते वरच्या माळ्यावर असतात. तर एक तरूण खाली असतो. मग खालचा मित्र वरच्या तिघांना खाली बोलावतो. ते तिघं विचारतात, काय काम आहे, मात्र खालचा तरूण काहीच सांगत नाही, फक्त काम आहे, असं बोलतो. मग ते तिघं खाली येतात. आल्यावर खालचा तरूण त्यांना पैसे मागतो. मग ते विचार करतात. केवळ पैसे मागण्यासाठी यानं आपल्याला खाली बोलावलं. मग तेही या तरुणाला म्हणतात. तू आधी वर चल.

‘वरूनही मागू शकला असता’

खालचा तरूण मग या तिघांसोबत वर जातो. तिथं गेल्यावर ते याला पैसे देतात. मग तो तरूण म्हणतो, ते तर तुम्ही खालीही देऊ शकला असता. तेव्हा हे तिघं बोलतात, तू खालूनही पैसे मागू शकला असतास. आम्ही वरून टाकले असते. असा हा भन्नाट व्हिडिओ यूट्यूबवर Jomy Production या चॅनेलवरून अपलोड करण्यात आलाय. ‘Jese Ko Tesa‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलीय. 27 जानेवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 56,260,576+ व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. व्हिडिओखालच्या कमेंट्सही वाचण्यासारख्याच आहेत. (Video Courtesy – Jomy Production)

तंदूरी ऑम्लेटचा तडका, अंग अंग भडका..! दिल्लीच्या या काकांनी बनवलीय अजबच रेसिपी, Video Viral

Viral : पोलिसांना फायर नाही तर फूल समजलं आणि..; रक्तचंदन तस्कराच्या रिअल लाइफमध्ये काय घडलं? वाचा

Stunt Video Viral : …आणि स्टंट करण्याच्या नादात थेट जमिनीवरच कोसळतो..! भावांनो, तुम्ही असं काही करू नका, नाहीतर…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.