Dog playing basketball video : पाळीव प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असतात. विशेषत: सोशल मीडिया यूझर्सना कुत्रे (Dogs) आणि मांजरां(Cats)शी संबंधित संबंधित व्हिडिओ मोठ्या उत्साहानं पाहायला आवडतं. यामुळेच त्यांच्याशी संबंधित एखादा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला, की लगेच व्हायरल होतो. या प्रकारात आता डॉगीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉगी बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. बास्केटमध्ये टाकण्यासाठी कुत्रा ज्या पद्धतीनं बॉल त्याच्या मालकाकडे टोलवतो, ते बघताना तुम्हाला खूप मजेदार वाटेल. डॉगीचा हा व्हिडिओ यूझर्सनाही प्रचंड आवडलाय. व्हायरल झालेला हा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे, पण तो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. चला तर मग आधी जाणून घेऊया, काय आहे या व्हिडिओमध्ये, जो सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहे.
मालकासोबत बास्केटबॉल
व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकासोबत बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. याआधी मालक आणि कुत्रा एकमेकांना हाय फाइव्ह देतात. यानंतर मालक कुत्र्याकडे चेंडू देतो. यावर, कुत्रा ज्या पद्धतीनं डोक्यानं चेंडू टोलवतो ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बास्केटबॉल खेळताना मालक आणि कुत्रा यांच्यातला ताळमेळही आपल्याला दिसून येतो.
ट्विटरवर शेअर
डॉगीचा हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवर Laughs 4 All नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही तासांपूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ ट्विटरवर यूझर्सना आवडतोय. आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाइक केलं आहे. हा आकडा वाढतोय. याशिवाय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
A great assist…??? pic.twitter.com/QXdmw2Yrqh
— Laughs 4 All ? (@Laughs_4_All) January 26, 2022
माझ्या मांजरीनंही असा खेळ करावा
व्हिडिओ पाहिल्यानंतर या कुत्र्याच्या बास्केटबॉल कौशल्यानं सोशल मीडियावर यूझर्स विचार करत आहेत. एका यूझरनं डॉगीची स्तुती करताना लिहिलंय, की हे आश्चर्यचकित करण्यासारखं आहे. माझी इच्छा आहे की माझ्या मांजरीनंही असं काहीतरी केलं असतं.’ त्याच वेळी, दुसर्या यूझरनं डॉगीचं कौतुक करताना लिहिलंय, की हा NBAच्या सदस्यापेक्षाही पुढे आहे.