Viral: शिंदे गटाला कोर्टाचा दिलाशानंतर भुमरेंनी भुवया उडवल्या?, व्हिडीओ व्हायरल, उडे-उडे रे अखिया..!

संदीपान भुमरेंची ही रिएक्शन कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटली नाही. संदीपान भुमरे यांच्या उडणाऱ्या भुवयांवर नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली. उडी उडी जाए गाण्यावर नेटकऱ्यांनी संदीपान भुमरेंच्या मनातले भाव, ओठावर आणण्याचं काम केलं.

Viral: शिंदे गटाला कोर्टाचा दिलाशानंतर भुमरेंनी भुवया उडवल्या?, व्हिडीओ व्हायरल, उडे-उडे रे अखिया..!
संदीपान भुमरेंचा दिल्लीवारीतील तो व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 6:52 PM

मुंबई: खरी शिवसेना कुठली, पक्षचिन्हं कुणाचं? (Shiv sena Political Crisis) यावरुन सर्वोच्च न्यायालयात (SC) आज (27 सप्टेंबर) जोरदार युक्तीवाद झाला. दिवसभर चाललेल्या युक्तीवादात कोर्टाने ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) मोठा धक्का दिला, आणि शिवसेनेची याचिका फेटाळली. शिवाय, शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवणार असल्याचं सांगितलं. हा शिंदे गटाला (Eknath Shinde) सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. यानंतर आता शिंदे गटाच्या गोटात आनंदाला पारावार उरलेले दिसत नाही. अशाच सोशल मीडियावर शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरेंचा (Sandipan Bhumre) व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत, आणि पत्रकारांच्या प्रश्ना उत्तरं देत आहे. त्यांच्या एका बाजूला दीपक केसरकर हे बसलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला संदीपान भुमरे बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ शिंदे गटाच्या दिल्लीवारीचा आहे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सगळे मुख्य आमदार गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते.

हे सुद्धा वाचा

या भेटीनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. याच पत्रकार परिषदेत संदीपान भुमरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसले होते. तेवढ्यात समोरुन कुणीतरी पत्रकाराने भुमरेंना इशारा केला. या इशाऱ्यावर भुमरेंनी भुवया उडवायला सुरुवात केली, आणि एकनाथ शिंदेंच्या दिशेने इशारा केला.

संदीपान भुमरेंची ही रिएक्शन कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटली नाही. संदीपान भुमरे यांच्या उडणाऱ्या भुवयांवर नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली. उडी उडी जाए गाण्यावर नेटकऱ्यांनी संदीपान भुमरेंच्या मनातले भाव, ओठावर आणण्याचं काम केलं.

संदीपान भुमरेंचा व्हायरल व्हिडीओ पाहा:

संदीपान भुमरेंचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही भुमरेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात भुमरेंनी आपली उद्धव ठाकरेंबद्दलची निष्ठा बोलून दाखवली होती. शिवाय, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना इशारा दिला होता. मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं, की सातव्या मजल्यावरुन उडी मार, तरी मी मागे-पुढे पाहणार नाही, असं वक्तव्य संदीपान भुमरेंनी केलं होतं.

त्याच्याच काही दिवसांनंतर संदीपान भुमरेंनी बंडखोरी केली. मुंबईतून गुवाहाटी व्हाया सूरत असा प्रवास केला. आणि आता शिंदे गटाशी एकनिष्ठ असल्याचं सर्वांना सांगितलं.

त्यातच, शिवसेना कुणाची हा प्रश्न उभा राहिला असताना, एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार दिल्लीवारीवर गेले. तिथं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. गृहमंत्री अमित शाहांनाही एकनाथ शिंदे भेटले. त्यानंतर महाराष्ट्र भवनात एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.