Video : विमानात दोन पॅसेंजर भिडले, कोणी आता पोहचणार नाही… प्रवाशांची पाचावर धारण बसली
इंडिगोच्या फ्लाईटमध्ये केबिन समोर सामान ठेवण्यावरून दोन प्रवासी हातघाईवर आले. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.आता याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
आपण ट्रेनमध्ये जागेवरुन होणाऱ्या मारामाऱ्या पाहील्या असतील,अशावेळी प्रवाशी एकमेकांना लोकलमधून फेकून देण्याच्या धमक्या देतात. आता थेट आकाशात हजारो फूट उंचावर असलेल्या विमानात जर दोन प्रवाशांची हाणामारी झाली तर काय परिस्थिती ओढावेल,आता इंडिगो कंपनीच्या विमानात दोन प्रवाशांच्या झालेल्या मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवासी एकमेकांवर किंचाळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दोघांचे नातेवाईक महिला देखील ही भांडणे अडविताना दिसत आहे. या भांडणामुळे केबिन क्रुची पंचायत झाली आणि विमानाचे पायलट देखील टेन्शनमध्ये आले अखेर…
ही आश्चर्यकारक घटना 13 सप्टेंबर गोवाहाटी ते दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या एका फ्लाईटमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. या मारामारीचा व्हिडीओ एका प्रवाशाने व्हायरल केला आहे. या व्हिडीओत हे दोघे प्रवासी एकमेकांना धमक्या देताना दिसत आहेत. या दोघांना शांत करण्यासाठी क्रु मेंबरला हस्तक्षेप करावा लाला. परंतू क्रु मेंबरच्या हस्तक्षेपानंतर देखील हे दोघे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. ते एकमेकांचा उद्धार करताना या व्हिडीओत दिसत आहेत.
माझ्याशी उद्धटपणे बोलतोस असा एक प्रवासी दुसऱ्यावर खेकसताना दिसत आहे.सॉरी बोलून उपकार करीत आहेस का ? यावर चिडलेला दुसरा प्रवासी म्हणतो की कोणी दिल्लीला जाणार नाही. त्यानंतर इतर प्रवाशांसह क्रु मेंबर देखील टेन्शनमध्ये आले. या व्हिडीओत एक महिला देखील त्या दुसऱ्या पॅसेंजरची माफी मागताना आणि हे भांडण थांबविण्याची विनंती करताना दिसत आहे. ही महिला दोघा भांडणाऱ्या प्रवाशांपैकी एकाची नातेवाईक वाटत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
टेक ऑफ से पहले फ्लाइट में हंगामा, 2 यात्री आपस में भिड़े #IndiGo #ViralVideo | @karunashankar pic.twitter.com/U9fR4CBkva
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) September 17, 2024
हे भांडण सुरु होण्यास एक घटना कारणीभूत ठरली आहे. फ्लाईटमध्ये केबिन समोर सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये शाब्दीक चकमक उडून नंतर दोघेही हातघाईवर आले. एक कुटुंब आपल्या इतर कुटुंबियासह विमानातून प्रवास करीत होते. त्यावेळी एका समोर बसलेल्या प्रवाशाशी त्या कुटुंबातील एका सदस्याचे वाद झाले. त्यानंतर शब्दाला शब्द वाढत जाऊन भांडण इतके विकोपाला गेले की आपण विमानात बसलो आहोत की लोकल ट्रेन किंवा एसटीमध्ये हेच प्रवासी विसरले. या वेळी क्रु मेंबरनी हस्तक्षेप करुनही दोन्ही प्रवाशांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. या व्हिडीओला पाहून अनेक युजरनी मजेशीर प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. काही ही लोकलमधील जागेसाठी रोज होणाऱ्या भांडणासारखी भांडणे वाटत आहेत.