Video | विनातिकीट वंदेभारतमध्ये बिनधास्त बसला पोलीस, मग टीसीने जे केले त्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मिडीयावर वंदेभारत एक्सप्रेसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक पोलिसवाला वंदेभारतमध्ये बिनधास्त तिकीट नसताना प्रवास करताना दिसत आहे.
लखनऊ | 11 ऑक्टोबर 2023 : वंदेभारत देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असून या आलिशान ट्रेनने प्रवाशांचा वेळ वाचत आहे. देशातील अनेक शहरांना वंदेभारतने जोडले जात आहे. ही ट्रेन आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. या ट्रेनमधून विनातिकीट प्रवासाची कोणालाही परवानगी नाही. परंतू या ट्रेनमधून अलिकडेच एका पोलिसाने विनातिकीट प्रवेश केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पोलिसाचा वंदेभारतमधील प्रवासाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पाहा नेमके काय प्रकरण आहे.
सोशल मिडीयावर वंदेभारत एक्सप्रेसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक पोलिसवाला वंदेभारतमध्ये बिनधास्त तिकीट नसताना प्रवास करताना दिसत आहे. या ट्रेनमध्ये टीसीने या पोलिसाला चांगलेच धारेवर धरल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या पोलिसाने माझी ट्रेन सुटल्याने आपण या ट्रेनमध्ये नाईलाजाने चढल्याचा बचाव करताना दिसत आहे. आपली एक चुक माफ करावी अशी विनवणी त्याने टीसीला केल्याचे दिसत आहे.
माझी इंटरसिटी चुकली, एक संधी द्या
जर या गाडीत पोलिसांनी विनातिकीट प्रवासाला परवानगी नाही, तर तुम्ही कसे काय ? या ट्रेनमध्ये प्रवेश केला असे टीसीने विचारता, या पोलिसाने सांगितले की माझी इंटरसिटी चुकल्याने मला या ट्रेनमध्ये नाईलाजाने चढावे लागले. त्यावर टीसी त्याला म्हणतात की मग तुम्ही बसने का नाही गेलात ? आम्ही या ट्रेनमध्ये कोणालाही सोडत नाही, तुम्हाला मस्करी वाटली का ? टीसीने या पोलीसाला जर परवानगी नाही तर तुम्ही या ट्रेनमध्ये चढायला नको होते. चला बाहेर पडा. आता ट्रेन पुढील स्थानकावर उतरणार तेथे निमूटपणे उतरा. हा व्हिडीओ लखनऊ जाणाऱ्या वंदेभारत ट्रेनचा असल्याचे म्हटले जात आहे. आणि हा पोलिस उत्तर प्रदेश पोलीस दलातील आहे. या कर्तव्यतत्पर टीसीने या विनातिकीट पोलिसाला अखेर वंदेभारतमधून खाली उतरवले. आता या रेल्वे प्रशासन या व्हिडीओची तपासणी करीत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
ये वायरल वीडियो लखनऊ गोरखपुर वंदे भारत एक्सप्रेस की है ट्रेन में बिना टिकट एक दरोगा जी चढ़ गए …टीटीई ने डांटते हुए कहाँ नीचे उतरिए… अब दरोगा जी बेचारे फंस गए @IndianRailMedia @RailMinIndia pic.twitter.com/naddPmrlUB
— Raj B. Singh (@razzbsingh) October 9, 2023
अंकित कुमार या युजरने म्हटले की, ‘बिना पैसे तुम्ही कॉंग्रेसच्या राज्यात ट्रेनमध्ये चढू शकत होता. परंतू आजच्या खाजगीकरणाच्या जमान्यात ते शक्य नाही.’ तर रंजन कुमार यांनी लिहीले आहे की, ‘नियम सर्वांसाठी सारखेच असायला हवेत, टीसीने चांगले काम केले आहे. या लोकांनी फ्रि प्रवासाची सवय लागली आहे.’ बबलु कुमार या युजरने म्हटले की ‘पोलीस आहोत तर वंदेभारतमधून प्रवासाचे स्वप्न पुरे करू, घनघोर बेइज्जती झाली ! ‘