गावकरी बिबट्यासोबत मित्रासारखे खेळले, सेल्फी व्हिडीओ बनवले, शेवटी…
leopard attack : एखाद्या बकरीपेक्षा बिबट्या शांत असल्याचं एक प्रकरण उजेडात आलं आहे. मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यालीत एका गावात बिबट्या शांत असल्याची माहिती सगळीकडं व्हायरल झाली आहे. गाववाल्यांनी त्याच्यासोबत बसून फोटो काढले.
मध्यप्रदेश : राज्यातील देवास (MP Devas) जिल्ह्यातील एक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. मंगळवारी तिथल्या गावकऱ्यांना एक बिबट्या (leopard video) बाजूला असलेल्या झाडीत शांत बसल्याचा दिसला. ही घटना चार वाजता घडली आहे. ज्यावेळी तिथल्या स्थानिक गावकऱ्यांनी त्या बिबट्याला तिथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या बिबट्याने त्याची जागा अजिबात सोडली नाही. स्थानिक गावकरी त्या बिबट्याच्या जवळ बसले आणि हल्ला करु लागले. तरी सुध्दा बिबट्या जाग्यावरुन कुठेचं गेला नाही. ज्यावेळी बिबट्या (leopard attack video) काहीचं करीत नाही लोकांच्या लक्षात आले, त्यावेळी बिबट्यासोबत लोकं तिथली खेळायला लागली.
हा सगळा प्रकार देवास जिल्ह्यातील सोनकच्छ येथील आहे. तिथं पीपलरावां क्षेत्रातील इकलेरा माताजी गावातील लोकांनी बिबट्याला पाहिलं. ज्यावेळी लोकांनी त्या बिबट्याला पाहिलं, त्यावेळी ते तिथून पळून घरी आले होते. ज्यावेळी बिबट्या असल्याची माहिती संपूर्ण गावात पसरली, त्यावेळी लोकांनी हिम्मत दाखवली आणि बिबट्याच्या जवळ गेली. बिबट्या जागेवरुन अजिबात हलत नव्हता. तिथल्या स्थानिकांना असं वाटलं की, तो आराम करीत आहे. त्याला तिथून लोकांनी पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जागेवरुन हलायला तयार नव्हता.
ग्रामस्थांनी बिबट्याला तिथून पळवून लावण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर लोकांना तो आजारी असावा अशी शंका आली, त्यामुळे काही लोक हिंमत करुन त्याच्याजवळ गेली. त्यावेळी त्या ग्रामस्थांनी त्याच्या अंगावर हात ठेवला, त्याला गोंजरायला लागली. त्यावेळी लोकांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला, त्याचबरोबर चालवायचा प्रयत्न केला. ज्यावेळी बिबट्या एकदम शांत असल्याची खात्री झाली. त्यावेळी लोकं बिबट्यासोबत खेळू लागली.
सेल्फी घेऊन व्हिडीओ बनवले
गावकऱ्यांनी इचतका शांत बिबट्या कधीचं पाहिला नव्हता. सगळे त्या बिबट्यासोबत खेळत होते. काही ग्रामस्थांनी बिबट्यासोबत व्हिडीओ सुध्दा तयार केले आहेत. हा तमाशा खूपवेळ चालला होता. ज्यावेळी त्या ठिकाणी वनविभागाचे अधिक तिथं पोहोचले, त्यावेळी त्यांना बिबट्याची तब्येत बरी वाटतं नव्हती. त्यावेळी त्यांनी पिंचरा मागवला आणि बिबट्याला ताब्यात घेतलं.
Villagers seen risking their lives with a sick #Leopard 😳🤦🏼♂️#Indore #LeopardAttack #MPpic.twitter.com/IupnfecmKr
— Ajay AJ (@AjayTweets07) August 30, 2023
इंदोरच्या प्राणी संग्रहालयात आणले.
वनविभागाने त्या बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी केली, त्यावेळी त्याच्या अंगावर कसल्याची प्रकारची जखम दिसली नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शंका आहे की, बिबट्याने अधिक खाल्लं असेल की, तो आजारी असेल. बिबट्याच्या अजून चाचण्या करण्यात येणार आहे. त्याच्यावर उपचार करुन झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.