जेवणाची ऑर्डर देऊन महिलेने केले भलतेच, कोर्टात गेले प्रकरण, भरावा लागला दंड
हॉटेल मॅनेजमेंट तिचा सारा आधीचा रेकॉर्ड तपासून तिने ऑर्डर केलेल्या पदार्थांनूसार तिचा नव्याने हिशेब केला तर तिच्यामुळे हॉटेलला पाच लाखाचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले.
बिजिंग : जेव्हा आपण हॉटेलात जाता तेव्हा आपल्याला अनेक वेळा त्या हॉटेलातील अन्नपदार्थ खूपच आवडतात. त्यामुळे आपण नेहमी बाहेर जेवायला जाताना आपल्या आवडत्या हॉटेल किंवा रेस्ट्रॉरंटची निवड करीत असतो. आता चीनच्या एका महिलेचे प्रकरण चर्चेत आहे. ही महीला गेली अनेक वर्षे त्याच हॉटेलात जेवण करण्यासाठी जात होती. त्या हॉटेलाची एक ठराविक रकमेत पोटभर खा अशी ऑफर होती, या ऑफरचा पुरता लाभ या महिलेने मिळविला. मात्र त्याचा फटका अखेर तिला बसलाच.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनूसार ही घटना चीनमधील आहे. या प्रातांतील एक प्रसिद्ध हॉटेलात ठराविक रकमेत हवे तेवढे पोटभर खा अशी ऑफर होती. या परिसरात राहणारी महीला या हॉटेलाची ही महीला खूप जूनी कस्टमर होती. दरवेळी ती येथे एक चुक करायची. परंतू कधीच पकडली जात नव्हती. ती जेवढे पदार्थ खायायची त्यापेक्षा किती तरी जास्त पदार्थ ऑर्डर करायची. आणि गुपचुप आपल्या बॅगेत ते पदार्थ लपवायची. आणि हे सर्व जेवण घरी घेऊन जायची.
हा प्रकार अनेक दिवस सुरू होता. जेव्हा हॉटेलवाल्यांना तिचा संशय आला तेव्हा स्टाफने मॅनेजमेंटला तिची तक्रार केली. तेव्हा पासून या महिलेवर नजर ठेवण्यात आली. परंतू महिलेने पुन्हा हेच काम केले. परंतू आता तिचा सारा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हॉटेलवाल्यांनी तिचा आधीचा सारा रेकॉर्ड तपासला. तेव्हा ती पैसे कमी देऊन जास्त जेवण ऑर्डर करायची असे उघडकीस आले.
हॉटेल प्रशासनाने कोर्टात केस दाखल केली
त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट तिचा सारा आधीचा रेकॉर्ड तपासून तिने ऑर्डर केलेल्या पदार्थांनूसार तिचा नव्याने हिशेब केला तर तिच्यामुळे हॉटेलला पाच लाखाचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले. मग त्यानंतर या महिलेवर हॉटेल प्रशासनाने कोर्टातच केस दाखल केली. कोर्टाने हॉटेल प्रशासनाच्या बाजूने निकाल देत तिच्यावर पाच लाखांचा दंड फर्मावला आहे.