चोरांचा काहीही नेम नाही! चोरी (Theft) करण्यासाठी चोर कोणत्याही थराला जाऊ शकतात. चोरी होऊ नये म्हणून कुलपं आली. दुकांनावर शटर लावले गेले. पण चोऱ्या काही थांबल्या नाहीत. आता चोर कोण होते, हे कळावं, म्हणून दुकानांच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे सीसीटीव्ही कॅमेरेही (CCTV Video) लागले. पण चोऱ्या काही कमी झाल्याचं दिसून आलेलं नाही. चोरीचे अनेक सीसीटीव्ही तुम्ही पाहिले असतील. लॉक लावलेलं शटर चावी शिवायच चोरट्यांनी उघडल्याची घटना उघडकीस आली आहे. चकीत करणाऱ्या या घटनेचं सीसीटीव्ही पाहून आता दुकानदार हवालदिल झालेत. दुकानांना शटर लावणंही पुरेसं सुरक्षित नसल्याचं अधोरेखित करणारी ही घटना आहे. काही चोरटे आले. शटरला टाळं लागल्याचं त्यांनी पाहिलं. शेवटची शटरचा वाकवून वर ओढलं आणि आतल्या सामानाची चोरी केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून या घटनेचा व्हिडीओही व्हायरल (Viral Theft Video) झालाय.
वायरल व्हिडीओमध्ये एक चोर आधी दिसून येतो. तो एका शटर बंद दुकानासमोर थांबतो. या दुकानाच्या समोर हाताने खुणावून, आपल्याला इथेच चोरी करायची आहे, असं सांगतो. मागून त्याचे साथीदार येतात. चोरी करण्याच्या ठिकाणी थांबतात.
शटरला टाळ लागलंय पाहून चौघे जण शटरच वर ओढतात. ओढणीसारखा कपडा शटरच्या हॅन्डलला बांधून शटर वर ओढण्याचा हा प्रकार थरारक असतो. शटर वर येताच दोघे आत दुकानात घुसतात. सामानाची चोरी करतात. सामान घेऊन बाहरे येतात आणि घटनास्थळावरुन पळ काढतात.
दुकानाच्या शेजारीच लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरांचा हा सगळा प्रताप कैद होतो. पण हे सीसीटीव्ही बघेपर्यंत दुकानदाराचा माल मात्र लंपास झालेला असतो. एकूणच काय तर दुकानाला टाळं लावून निवांत घरी गेलेल्या दुकानाची या व्हिडीओ झोप उडवलीये. त्यामुळे दुकानदाराला शटर लावून टाळ लावणंच, पुरेसं नसल्याचीही जाणीव यानिमित्तानं अनेकांना झाली आहे.
giedde नावाच्या एका इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन हा चोरीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लाकंनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. चोरीच्या अनेक सीसीटीव्हीच्या घटना याआधीही तुम्ही पाहिलेल्या असतील. मात्र विना चावी शटर तोडून माल लंपास करणाऱ्यांची टेकनिक पाहून दुकानदार मात्र कमालीचे धास्तावले आहेत. त्यामुळे तुम्हीही जर दुकानाला टाळ लावून निर्धास्त असाल, तर हा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच पाहिजे.
दरम्यान हा व्हिडीओ नेमका कोणत्या भागातील आहे, हे कळू शकलेलं नाही. तसंच चोरीची ही घटना नेमकी कधीची आहे, याचीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ प्रचंड वेगानं शेअर केला जातो आहे.
गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना
मेट्रो स्टेशनवरच महिलेला प्रसूती वेदना, CISF महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिलेव्हरी