हे आहेत जगातील सर्वात बलवान देश, भारताचा क्रमांक कितवा ?
भारताची अर्थव्यवस्था जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्थामध्ये समाविष्ठ झाली आहे. आपल्या जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थेत स्थान मिळवायचे आहे.सध्या भारताचे जगात स्थान काय आहे. जगातील ताकदवान देश कोणते आहेत. त्याच्यात भारताचा क्रमांक कितवा आहे ? पाहुयात...
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : जगातील सर्वा ताकदवान देशांची चर्चा सुरु झाली तर आपल्याला अमेरिकेचा क्रमांक कितवा हे माहीतीच असते. जगातील सुपरपॉवर म्हणून अमेरिकेचे स्थान कायम आहे. 2024 युएस न्यूज पॉवर रॅंकींग्जच्या मते अमेरिका ही जागतिक सुपरपॉवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आपला दुश्मन चीनचा नंबर लागला आहे. चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला टक्कर देण्याच्या बेतात आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि आर्थिक विकास क्षेत्रामुळे हे शक्य झाले आहे. नेतृत्व, आर्थिक प्रगती, राजकीय प्रभाव, आंतरराष्ट्रीय मित्रसंबंध आणि लष्करी ताकद यावर ही देशांची यादी तयार करण्यात आली आहे.
अमेरिका हा देश त्यांच्या विविध क्षेत्रातील अचाट कामगिरीमुळे जगातील सुपरपॉवर पदी कायम आहे. या क्षेत्रात टेक्नॉलॉजी, फायनान्स आणि मनोरंजन या क्षेत्रांचा समावेश आहे. चीनने देखील तंत्रज्ञानात झेप घेतली आहे. एआय आणि 5G तंत्राच्या कामगिरीने चीनने मोठी कामगिरी केल्याने तसेच आर्थिक प्रभावामुळे चीन अमेरिकेला स्पर्धा करीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
रशियाचा तिसरा क्रमांक
एकेकाळी आपल्या प्रचंड पसाऱ्यामुळे दुसरी जागतिक महाशक्ती असलेला रशिया आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. भौगोलिक प्रभाव, सैनिकी महाशक्ती यामुळे रशियाने आपले तिसरे स्थान मिळविले आहे. जागतिक व्यवहारात अजूनही रशिया ताकदवान देश आहे. जर्मनीने आपल्या ग्रीन एनर्जी आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चौथे स्थान मिळविले आहे. युरोपातील आर्थिक शक्ती आणि तंत्रज्ञानासाठी जर्मनी ओळखला जातो. या यादीत इंग्लंड म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि साऊथ कोरिया अनुक्रमे चौथा आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. ब्रेक्झिट नंतरच्या व्यापारावर ग्रेट ब्रिटनने लक्ष पुरविले आहे. ग्रेट ब्रिटन हा देश तंत्रज्ञान वाढवणाऱ्या उद्योगांची वाढ करीत आहे आणि विकास वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना पाठींबा देत आहे. सहाव्या क्रमांकावर असलेला साऊथ कोरिया तंत्रज्ञान आणि नाविण्यपूर्ण कल्पना क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. साऊथ कोरियातील अग्रगण्य टेक कंपन्यांमुळे या देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. डिजीटलायेझन आणि ग्रीन एनर्जी यामुळे फ्रान्सचा यादीत सातवे स्थान आहे.
जपानचा आठवा क्रमांक
आपल्या चिप मॅन्युफॅक्चरिंग पासूनच्या इतर तांत्रिक प्रगतीमुळे जपानचा जगात ताकदवान देशात आठवे स्थान आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना, एआय तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीमुळे जपानाचा दबदबा आहे. अमेरिकेशी मैत्री आणि तेल संपन्नतेमुळे सौदी अरेबिया नवव्या क्रमांकावर आहे. तेलातील आलेली संपन्नता तसेच टुरिझममधील गुंतवणूक तसेच NEOM आणि 2034 चे FIFA WORLD CUP च्या यजमान पदामुळे सौदी अरेबिया या स्थानावर आहे. तर दहाव्या क्रमांकावर युएईचा या आणखी एका तेलसंपन्न देशाचा क्रमांक आहे. अंतराळ कार्यक्रमावर लक्ष देत सौदी अरेबियाने जागतिक स्तरावर आपली आर्थिक स्थिती मजबूत केली आहे.
भारताचा क्रमांक कितवा ?
आपला भारत देश 12 व्या क्रमांकावर आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि जागतिक मित्र आणि प्रभावी लष्कर सामर्थ्य याच्यामुळे भारताचा दबदबा तयार झाला आहे. जागतिक जीडीपीच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत केवळ अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या मागे आहे.