Viral Video : डोळ्यांसमोर चोरट्यानं पळवली महिलेची स्कूटी, चोराची शक्कल पाहून यूझर्स म्हणाले…

चोर फक्त संधी शोधत असतात (Theif Funny Video) आणि संधी मिळताच हात साफ करतात. अलीकडच्या काळात असाच काहीसा प्रकार समोर आलाय. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, आजच्या काळात कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही.

Viral Video : डोळ्यांसमोर चोरट्यानं पळवली महिलेची स्कूटी, चोराची शक्कल पाहून यूझर्स म्हणाले...
चोरानं पळवली स्कुटी
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 7:40 AM

चोर फक्त संधी शोधत असतात (Theif Funny Video) आणि संधी मिळताच हात साफ करतात. भरदिवसा आणि गर्दीतही चोर हात साफ करतात. अनेकदा चोरटे चोरी करताना असं काही करतात, जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अलीकडच्या काळात असाच काहीसा प्रकार समोर आलाय. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, आजच्या काळात कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही.

रुमालाच्या सहाय्यानं चोरी

चोराची चोरी करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. कारण आजपर्यंत तुम्ही चोरांना डुप्लिकेट चावीनं किंवा इतर कोणत्याही प्रकारे बाइक किंवा स्कूटी चोरताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी चोराला रुमालाच्या साहाय्यानं चोरी करताना पाहिलं आहे का, नाही ना? तर असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

करतो स्कुटीची रेकी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की आधी एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला स्कूटीची रेकी करते. स्कूटी कुलूपबंद असल्याचं त्यान पाहिलं. मात्र कुलूप तोडण्यासाठी त्यानं कोणत्याही गोष्टीचा वापर न करता दुसरी पद्धत अवलंबली. गाडी सुरू होऊ नये, म्हणून त्यानं शांतपणे स्कूटीच्या सायलेन्सरमध्ये कापड अडकवलं आणि तिथून निघून गेला. काही वेळानं मुलगी स्कूटीजवळ आली आणि ती बाइक स्टार्ट करत होती, मात्र मागे कापड बांधल्यामुळे स्कूटी सुरू होऊ शकली नाही.

मदतीचा बहाणा

स्कूटी सुरू न झाल्यानं मुलगी अस्वस्थ झाली, ते पाहून चोरट्यानं मुलीला मदत करण्याचा बहाणा केला. मुलीनं ताबडतोब चावी हातात धरली आणि मोबाइलवरून फोन करू लागली. दरम्यान, चोरट्यानं सायलेन्सरमधून रुमाल काढून स्कूटी पळवली.

यूझर्सच्या कमेंट्स

सोशल मीडियावर चोरीची ही पद्धत पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून, त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून व्यक्त होत आहेत. एका यूझरनं लिहिलं, की ‘चोरी के लिए बंदे क्या दिमाग लगाया है.’ तर दुसऱ्या यूझरनं लिहिलं, ‘ये तो प्रोफेसर से भी चालबाज निकला.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर कमेंट करून आपलं मत मांडलं.

Viral Video : बाळाला रांगायला शिकवतंय ‘हे’ कुत्र्याचं पिल्लू; पाहा, कुत्रा आणि बाळाचा खट्याळपणा

Viral : डान्स करताना मुलासोबत घडलं असं काहीतरी, Video पाहून हसू आवरणार नाही

हॅलो श्रीनगर, बाय बाय स्वित्झर्लंड… आनंद महिंद्रांनी शेअर केले हुडहुडी भरवणारे सुंदर Photos

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.