Video : मंदिरात चोरी करायला गेला आणि खिडकीत अडकला, नेटकरी म्हणतात, “जैसे कर्म तैसे फळ!”
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एका चोरट्याची झालेली फजिती लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. एक चोरटा एका मंदिरात चोरी करायला जातो. त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेत. चोरटा मंदिराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पण तो खिडकीत अडकतो.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चित्रविचित्र गोष्टी पाहायला मिळतात. त्यातले काही व्हीडिओ पाहून अनेकदा हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (Viral video) होत आहे. यात एका चोरट्याची (Thief) झालेली फजिती लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. एक चोरटा एका मंदिरात चोरी करायला जातो. त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेत. चोरटा मंदिराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पण तो खिडकीत (Window) अडकतो. रिपोर्ट्सनुसार, पापाराव असं या चोर तरुणाचं नाव आहे. त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने तो खिडकी तोडून मंदिरात घुसला, मात्र बाहेर येताना तो खिडकीतच अडकला. अश्या विचित्र अवस्थेत अडकल्यानंतर या तरुणाने हाका मारायला सुरूवात केली. तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले.स्थानिकांच्या मदतीने तो बाहेर पडला. हा व्हीडिओ आंध्र प्रदेशातील जानी येलम्मा मंदिरातील आहे.
व्हायरल व्हीडिओ
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एका चोरट्याची झालेली फजिती लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. एक चोरटा एका मंदिरात चोरी करायला जातो. त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेत. चोरटा मंदिराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पण तो खिडकीत अडकतो. रिपोर्ट्सनुसार, पापा राव असं या चोर तरुणाचं नाव आहे. त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने तो खिडकी तोडून मंदिरात घुसला, मात्र बाहेर येताना तो खिडकीतच अडकला. अश्या विचित्र अवस्थेत अडकल्यानंतर या तरुणाने हाका मारायला सुरूवात केली. तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आलं.या तरूणाला बाहेर काढण्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मंदिरातील चोरीचे दागिने पोलिसांनी तरुणाकडून जप्त केले आहेत.
#AndhraPradesh के श्रीकाकुलम में श्री जानी येलम्मा मंदिर की खिड़की तोड़ घुसा चोर आभूषण चोरी करके वापस निकलने की कोशिश में खिड़की में अटका। #THIEF #CCTVFootage #ViralVideo pic.twitter.com/CYGvDMBdM4
— Veerendra Verma (@Veeren_Verma) April 6, 2022
या व्हीडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. “खोटं वागणं देवाला चालत नाही. देवाने जागेवरच न्याय दिला”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर दुसरा म्हणतो,“अरे देवा! काय विचित्र माणूस आहे. त्याच्या कर्मानेच तो जाळ्यात अडकला.” तर “जैसे कर्म तैसे फळ!”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.
संबंधित बातम्या