VIDEO | स्कूटी चोरण्यासाठी घरात घुसले, पण स्वतःची स्कूटी सोडून चोरटे इतकं-तिकडं पळू लागले, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसाल
Funny Viral Video : घरात स्कुटी चोरी करण्यासाठी गेल्यानंतर चोरांची काय अवस्था झाली आहे. हे तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू कंट्रोल होणार नाही. एवढं मात्र निश्चित.
मुंबई : सोशल मीडियावर (Funny Viral Video) सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लोकांनी चोरट्यांची अवस्था कशी केली आहे, हे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये लोकं चोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि सापडतात सुध्दा, सध्या सोशल मीडियावर एक सीसीटिव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन चोरटे स्कुटर (scooter)चोरण्यासाठी सोसायटीमध्ये प्रवेश करतात. गाडी गेटमधून बाहेर काढल्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा. चोरट्यांचा पाठलाग करताना लोकं सुध्दा तुम्हाला दिसत आहेत.
चोरटे नेहमी चोरी करताना काळजी घेतात. त्याचबरोबर एखादी वस्तू चोरून न्यायची आहे, ती वस्तू चोरी करुन घेऊन जातात. पण प्रत्येकवेळी चोरट्यांना यश मिळतचं असं काही नाही. हा नियम अनेकांना लागू होतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये दोन चोरटे स्कुटी चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यावेळी ते चोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांच्याकडून स्वत:ची असलेली स्कुटी तिथचं सोडावी लागते.
चोरी करताना चोरांचं नुकसान
व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती हा व्हि़डीओ शेअर झाला आहे. त्यामध्ये दोन चोर घराच्यासमोरुन स्कुटरची चोरी करीत असल्याचं पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी चोरं स्कुटी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी घरातील लोकं त्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत. चोरट्यांच्यामध्ये आणि तरुण यांच्या तिथं हाणामारी सुध्दा झाली आहे. त्यावेळी चोरट्यांनी आणलेली स्कुटी ते तिथेचं सोडून निघून जातात.
Two thieves went to steal a motorcycle and ended up losing theirs. pic.twitter.com/BOSpL2PAjV
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 29, 2023
हा व्हिडीओ 31 मिलियन लोकांनी पाहिला
हा व्हिडीओ ट्विटरवरती @cctvidiots नावाच्या अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, दोन चोरट्यांनी घरातून स्कूटी चोरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांचीच स्कूटी सोडून इतरत्र पळावं लागलं. हा सगळा प्रकार पाहिल्यापासून नेटकरी फक्त हसत आहेत. हा व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. काही लोकांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.