Viral Video : चोरांनी एटीएम लुटण्यासाठी केली भन्नाट आयडीया, मशिनला रस्सीने बांधून कारने ओढले, परंतू त्यानंतर जे झालं….
चोरट्यांनी लोकप्रिय हॉलीवूड चित्रपट 'फास्ट अँड फ्युरियस' या चित्रपटांतून प्रेरणा घेऊन एटीएम लुटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : एटीएम लुटण्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. असाच एटीएम लुटण्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही चोरटे एटीएम लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला आहे. आणि त्यांनी आपल्या कारच्या मदतीने एटीएम मशिन लुटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टीपल्या आहेत. हा चोरीचा प्रयत्न त्यांनी एका चित्रपटातून प्रेरणा घेऊन केला आहे. ते मोठा तयारीने एटीएम लुटण्याचा प्रयत्न करतात. परंतू अखेर काय होते हे व्हिडीओत पाहणे मजेशीर आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील येलमभगत परिसरातील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम मशिन लुटण्यासाठी बुधवारी 6 सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी केलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरट्यांनी एटीएम मशिनला रस्सी बांधून गाडीने ते ढकलत नेण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू हा प्रयत्न फसल्यात जमा झाला. बॅंकेच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांना वर्दी दिल्याने चोरट्यांना हात हलवत पळून जावे लागले.
येथे पाहा व्हिडीओ –
Fast & Furious dekhne ke baad car se ATM tod rahe 😭 pic.twitter.com/XRahj82svw
— Raja Babu (@GaurangBhardwa1) September 8, 2023
चोरट्यांनी लोकप्रिय हॉलीवूड चित्रपट ‘फास्ट अँड फ्युरियस’ या चित्रपटांतून प्रेरणा घेऊन या चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. कारण या चित्रपटातही बँकेच्या तिजोरी चोरण्याचा असा सिन आहे. अनेक युजर्स या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला, ‘फास्ट अँड फ्युरियस’ पाहिल्यानंतर हा चोरीचा प्रयत्न केल्याची कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर ( एक्स ) @GaurangBhardwa1 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 61 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 644 युजरनी त्याला लाईक्स केले आहे. परंतू चोरट्यांनी प्लानिंग पाहून युजर त्यांच्यावर निरनिराळ्या कमेंट करीत आहेत.