Viral video : रणरणत्या उन्हात तहानलेल्या सापाला तळहातात पाणी घेऊन पाजलं; पाहा, पुढे काय झालं?
Snake shocking video : उन्हाळा (Summer) सुरू होत आहे. एक सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ एका सापाशी (Snake) संबंधित आहे, ज्याला उन्हाळ्यात तहान लागली आहे. एक व्यक्ती तळहातावर पाणी घेऊन त्याला पाजत आहे.
Snake shocking video : उन्हाळा (Summer) सुरू होत आहे. या ऋतूत पाणी अमृत मानले जाते. माणसाला तहान लागली की तो तहान शमवतो, पण मूक पशू, पक्षी, प्राण्यांना उन्हात तहान लागते. काही लोक उन्हाळ्यात घराबाहेर आणि टेरेसवर प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात. तर काही त्यांना स्वत: पाजतात. आता पाळीव प्राण्यांना स्वत: पाणी पाजणे धोक्याचे नाही, मात्र जंगली प्राण्यांच्या जवळ गेल्यास कधीही ते धोकादायक बनू शकते. असाच एक सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हायरल झालेला व्हिडिओ एका सापाशी (Snake) संबंधित आहे, ज्याला उन्हाळ्यात तहान लागली आहे. यादरम्यान एक व्यक्ती तळहातावर पाणी घेऊन सापाची तहान भागवताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूझर्सना धक्का बसला आहे. असे पाणी साप पिऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसत नाही.
बाटलीतील पाणी तळहातावर घेतो आणि…
झाडावर सरपटणाऱ्या या सापाला तहान लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रणरणत्या उन्हात सापाला प्यायला कुठेच पाणी मिळत नाही. दरम्यान, एक व्यक्ती तिथे येते आणि बाटलीतील पाणी तळहातावर ओतते आणि सापाला पाजू लागते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आता घडते. बाटलीतील पाणी तळहातावर टाकताच सापही गटातटात पिऊ लागतो. असे पाणी पिताना सापाला पाहून आश्चर्य वाटते. पाहा हा धक्कादायक व्हिडिओ –
Summer is approaching. Your few drops can save someone’s life. Leave some water in your garden in a container for that can mean a choice between life & death for many animals? pic.twitter.com/ZSIafE4OEr
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 9, 2022
ट्विटर अकाउंटवरून शेअर
49 सेकंदांचा हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की उन्हाळा येत आहे. तुमचे काही थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. तुमच्या बागेत एका कंटेनरमध्ये थोडे पाणी टाका. कारण ते अनेक प्राण्यांसाठी जीवन आणि मृत्यू यांच्यातील पर्याय असू शकते. या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक केले आहे.