मुंबई मेट्रोमधून हा मुलगा रोज सायकल सोबत घेऊन जातो, लोकं करतात कौतुक
एक मुलगा प्रवासात आपली सायकल सोबत ठेवत आहे. अनेकांना त्याची अनोखी स्टाईल आवडली आहे. त्याच्याबाबत ट्विटरवरती माहिती व्हायरल झाल्यानंतर...
मुंबई : मुंबईत (Mumbai metro) एका ठराविक वेळेत प्रवास करीत असताना तुम्हाला गर्दी जाणवते आणि दिसते. एका सेवानिवृत्त आयपीएस (Retired IPS Officer) अधिकाऱ्याने एका मुलाच्या प्रवासाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. ती पोस्ट अधिक लोकांना आवडली आहे. एक छोटा मुलगा मेट्रोचा कशा पद्धतीने पुरेपूर फायदा करुन घेत आहे, अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्या ट्विटरवरच्या (twitter post) पोस्टला अधिक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्या मुलाचं कौतुक देखील केलं आहे.
rarajeev@Mumbai 2.O या ट्विटरच्या खात्यावरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्या मुलाने प्रवास करीत असताना हेल्मेट घातलं आहे. मेट्रोमध्ये त्याच्याबाजूला एक सायकल उभी आहे.
कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “हा छोटा मुलगा रोज मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास करीत आहे. त्याचबरोबर हा मुलगा ट्यूशनला जात आहे. त्याने कशा पद्धतीने त्याची सायकल एका बाजूला पार्क केली आहे. हा मुलगा मेट्रोचा पुरेपूर फायदा घेत आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार लोकांना अधिक आवडला आहे. त्यामुळे लोकांनी त्याची तारिफ केली आहे.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर अनेकांनी ही पोस्ट आपल्या वैयक्तिक सोशल मीडियावर शेअर केली आहे. एका यूजरने लिहिले की, “हे छान आहे.” दुसर्या यूजरने लिहिले, “उत्तम! जेव्हा मी हे पाश्चात्य देशांमध्ये पाहायचे तेव्हा मला खूप हेवा वाटायचा.”
This young boy is a daily traveler in #MumbaiMetro, goes to attend tuition. It was a pleasant site to witness him parking his bicycle easily. He looked very comfortable with the metro services. All the best to him. @MMMOCL_Official @pedalandtring @PMOIndia pic.twitter.com/SkD7NHDHay
— rarajeev@Mumbai 2.O (@mumbai_2) April 6, 2023
मुंबईच्या मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी असते. प्रवास करीत असताना अनेकांना त्रास होतो. मुलाने सायकल एका बाजूला लावली आहे. त्यामुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.