हा रुबाबदार कोंबडा स्टार झाला, लिलावात 34 हजाराचा भाव मिळाला

या कोंबड्याने दहा हजार रूपयांची भाव गाठल्यानंतर चुरस वाढतच गेली. अखेर पाहता पाहता.. तो वीस हजार रुपयांवर पोहोचला. 20,000 पार केल्यानंतर आयोजकांनी पुढे बोली लावणाऱ्याने लिलाव जिंकता आला नाही तरी एक हजार देण्याची अट घातली तरी बोली येत राहीली..

हा रुबाबदार कोंबडा स्टार झाला, लिलावात 34 हजाराचा भाव मिळाला
roosterImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 9:37 AM

केरळ : पेरुंबरम येथील एका स्थानिक मंदिरांसाठी झालेल्या लिलावात ( auction )  एका कोंबड्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. या तुर्रेदार कोंबड्याला ( rooster ) या उत्सवातील लिलावात तब्बल 34,000 रूपयांचा भाव मिळाला आहे. या कोंबड्याला पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. मंदिराच्या उत्सव कमिटीने या लीलावाचे आयोजन केले होते. इरट्टी जवळील पेरूंबरम येथे हा लिलाव झाल्याचे म्हटले जात आहे. एका स्थानिक मंदिराच्या कामासाठी या लिलावाचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते.

इरट्टी जवळील पेरुंबरम येथील नवीन भगवती मंदिराच्या उत्सव समितीने मंदीराच्या कामासाठी एका लिलावाचे आयोजन केले होते. यात कोंबड्याचा लिलाव करण्यात आला, या कोंबड्याच्या लिलावाची सुरूवात अवघ्या दहा रूपयाने झाली. त्यानंतर बोलीची रक्कम वाढतच गेली. लिलावात या कोंबड्याने आधी हजार रूपयांपर्यंत झेप घेतली. काही वेळात कोंबड्याने दहा हजाराची बोली गाठली. तरीही लिलावासाठी बोली येतच राहिली.

या कोंबड्याने दहा हजार रूपयांची भाव गाठल्यानंतर चुरस वाढतच गेली. अखेर पाहता पाहता.. तो वीस हजार रुपयांवर पोहोचला. 20,000 पार केल्यानंतर, आयोजकांनी त्यानंतरच्या प्रत्येक बोलीसाठी 1,000 रुपये निश्चित केले. तरीही, बोली दारांनी हार न मानता स्पर्धेत ते कायम राहिले. त्यानंतर बोली वाढतच गेल्या आणि आणि या अखेर तब्बल चार किलो वजनदार आणि रूबाबदार कोंबड्याला 34,000 रूपयांच्या बोलीवर एका ग्रामस्थाने विकत घेतले. उत्सव समितीचे अधिकारी पी.असोकन, व्ही.के. सुनेश, व्ही.पी. महेश, के. सरथ, एम. शिनोज, एम. प्रमोद यांच्या नेतृत्वाखाली दोन तासांचा लिलाव पार पडला. उत्सव घोष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये जास्त किमतीचे लिलाव झाले असले तरी 34,000 रुपयांचा लिलाव जिंकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.