2025 मध्ये जगाचा अंत अशा प्रकारे सुरू होणार, बाबा वेंगा यांनी केलेली धक्कादायक भविष्यवाणी
बाबा वेंगा यांच्या 2025 च्या भविष्यवाण्यांबद्दल नेहमी चर्चा असते. त्यांनी 2025 मध्ये जगाचा अंत सुरू होण्यास सुरुवात होईल असं भाकीत त्यांनी केले होतं. नवीन वर्षासाठी त्यांनी केलेलं हे भाकीत धक्कादायक आहे.
बाबा वेंगा हे नाव आपल्या सर्वांनाच माहित आहे. शिवाय त्यांनी केलेल्या अनेक घटनांचे भाकीत बऱ्यापैकी खरे ठरले असल्याचंही बोललं जातं. तशी काही सत्येही समोर आली आहेत. दरम्यान 2025 मध्ये जगाचा अंत सुरू होण्यास सुरुवात होईल असं भाकीत त्यांनी केले होतं. नवीन वर्षासाठी त्यांनी केलेलं हे भाकीत धक्कादायक आहे.
2025 मध्ये जगाचा अंत होण्यास सुरुवात होणार?
आता नवीन वर्ष 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, येत्या वर्षाच्या संदर्भात बाबा वेंगाच्या काही भाकितांची खूप चर्चा होत आहे, जी खूपच भीतीदायक आहे.
वास्तविक, बाबा वेंगा यांनी दावा केला आहे की जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल. या विनाशाची सुरुवात युरोपपासून होईल, असा त्यांनी व्यक्तव्य केलं होतं. बाबा वेंगा डोळ्यांनी पाहू शकत नव्हती, पण त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी खऱ्या ठरल्याटं म्हटलं जातं.
बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय बनल्या आहेत, कारण त्यांचे शब्द अनेकदा चिंताजनक असतात. 1911 मध्ये बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले, मात्र त्याआधी त्यांनी 5079 या वर्षासाठी अनेक भाकिते केली होती. त्यांना बल्गेरियाचा ‘नॉस्ट्राडेमस’ म्हणतात. फ्रान्सचा नॉस्ट्राडेमस हा महान संदेष्टा होता.
जगाच्या अंताची सुरुवात 2025 च्या संदर्भात, बाबा वेंगा यांचा दावा आहे की युरोपमध्ये असे विनाशकारी युद्ध सुरू होईल, ज्याचा परिणाम खंडातील लोकसंख्येवर होईल. त्यांनी याला जगाच्या अंताची सुरुवात म्हटले आहे. असे अंदाज अनेकदा चुकीचे ठरतात, मात्र तरीही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नैसर्गिक आपत्तींचा कहर याशिवाय बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाण्यांमध्ये विनाशकारी नैसर्गिक आपत्तींचा उल्लेख केला आहे. यामध्ये सुप्त ज्वालामुखीतील स्फोट, प्रचंड पूर आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील शक्तिशाली भूकंप यांचा समावेश आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश होईल.
कर्करोगावर ठोस उपचार सापडेल बाबा वेंगा यांनी अवयव प्रत्यारोपण आणि कॅन्सरसारख्या गंभीर उपचारांमध्ये मोठे यश मिळेल अशी भिवष्यवाणी केली होती. आणि त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली तर, मानवतेसाठी ती मोठी उपलब्धी ठरेल. दरम्यान रशियाने कर्करोगाची लस बाजारात आणल्याची चर्चा आहे.
मानवी सभ्यता संपेल बाबा वेंगा यांनी असेही म्हटले आहे की 2028 मध्ये मानव शुक्राचा ऊर्जा स्त्रोत म्हणून शोध सुरू करतील. त्याच वेळी, 2033 मध्ये हिमनद्या वितळल्यामुळे, जगभरातील समुद्राच्या पातळीत धोकादायक वाढ होण्याचा अंदाज आहे. 3797 मध्ये मानवता धोक्यात येईल आणि 5079 मध्ये जगाचा अंत होईल असा त्यांचा दावा आहे