ही आहे जगातील सर्वात छोटी विमान यात्रा; फक्त इतक्या सेकंदांसाठी उडते विमान
५३ सेकंदाच्या हवाई उड्डाणासाठी रोज सुमारे १४ पाऊंड खर्च करावे लागतात. भारतीय रुपयात याची किंमत सुमारे १ हजार ८१५ रुपये आहे. स्कॉटलँडच्या हिशोबाने हा किराया खूप कमी आहे. सरकार या उड्डाणासाठी अनुदान देते.
नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत जगातील सर्वात लांब उड्डाण करणाऱ्या फ्लाईटबद्दल (Air travel) ऐकलं असेल. भारतातून युरोप (Europe) किंवा अमेरिकेला जायचं असेल तर कित्तेक तास विमान प्रवास करावा लागलो. दिल्ली ते मुंबई विमानानं प्रवास करत असाल तर किमान दोन तास प्रवास करावा लागतो. पण, हवेत उड्डाण करणारं एक असंही विमान आहे की, जे फक्त टेक ऑफनंतर ५३ सेकंदात जमिनीवर येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एक व्यावसायिक उड्डाण आहे. रोज काही प्रवासी या फ्लाईटच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.
कुठे होते छोटी उड्डाण
सीएनएनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, किमान ५३ सेकंदांची ही उड्डाण स्कॉटलँडमध्ये होते. स्कॉटलँडच्या दोन किनाऱ्यांमध्ये हे उड्डाण होते. असं केलं जाते कारण या दोन्ही किनाऱ्यांवर पुलिया नाही. या समुद्रातून बोट चालविणेसुद्धा शक्य नाही. त्यामुळं एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी विमानसेवेचा वापर केला जातो. ही सेवा लोगान एअर ऑपरेट करते. ही सेवा गेल्या ५० वर्षांपासून सुरू आहे.
किरायाचा खर्च किती
५३ सेकंदाच्या हवाई उड्डाणासाठी रोज सुमारे १४ पाऊंड खर्च करावे लागतात. भारतीय रुपयात याची किंमत सुमारे १ हजार ८१५ रुपये आहे. स्कॉटलँडच्या हिशोबाने हा किराया खूप कमी आहे. सरकार या उड्डाणासाठी अनुदान देते. त्यामुळं लोकांना किराया कमी द्यावा लागतो. दोन्ही किनाऱ्यांवर सुमारे ६९० लोकं राहतात.
काय आहे या किनाऱ्यांची नाव
एका किनाऱ्याचे नाव आहे वेस्ट्रे आणि दुसऱ्या किनाऱ्याचे नाव आहे पापा वेस्ट्रे. पापा वेस्ट्रेमध्ये सुमारे ९० लोकं राहतात. ज्या फ्लाईटने ते यात्रा करतात ती छोटी फ्लाईट आहे. या फ्लाईटने फक्त ८ प्रवासी प्रवास करू शकतात. पर्यटन हे या लोकांचं उपजीविकेचं साधन आहे. या छोट्याशा विमानातून प्रवास करायचा असेल तर तुम्हाला स्कॉटलँडला जावं लागेल.