Video | पैसे काय झाडाला लागतात का? खरी बाब समजल्यावर हसु आवरणार नाही, पाहा व्हिडीओ

आपण पैसे काय झाडाला लागतात का ? असं सहज म्हणतो. पैसे खरंच झाडला लागत नाहीत. पण तरीही लोक अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवतात. सोशल मिडीयावरील हा व्हिडीओ पाहीला तर तुम्हालाही हसू आवरणार नाही...

Video | पैसे काय झाडाला लागतात का? खरी बाब समजल्यावर हसु आवरणार नाही, पाहा व्हिडीओ
MONEY TREE Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 8:07 PM

नवी दिल्ली | 23 ऑक्टोबर 2023 : सगळी सोंग आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही. पैशासाठी सगळं जग भुलतं..बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या अशा म्हणी पैशांचं महत्व अधोरेखीत करते. आकाशातून पैशांचा पाऊस पाडून दाखवण्याचे आश्वासन देणाऱ्या भोंदू बाबांच्या मागे अजूनही लोक फसत असतात. कोणी पैशाची मागणी केली तर आपण म्हणतो पैसे काय झाडाला लागतात का ? पण अशाच एका पैसे पडणाऱ्या झाडाचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की एक मुलगा आपल्या पायाने झाडाला स्पर्श करताच झाडांतून नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. हा तरुण लागलीच त्याच्या डोक्यावर पडणाऱ्या या नोटांना जमा करताना व्हिडीओ दिसत आहे. या तरुणाच्या हालचाली रस्त्यावरील इतर पादचारी देखील पाहात आहेत. त्यानंतर हा तरुण पुन्हा झाडाला किक मारतो आणि पुन्हा झाडावरुन नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. पुन्हा या पडलेल्या नोटा तरुण गोळा करताना दिसत आहे. त्यानंतर या नोटा खिशात ठेवून झाडाचे आभार मानत हा तरुण येथून निघून जाताना दिसत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

झाडाला लाथ मारून नोटांचा पाऊस सुरु असल्याचे आक्रीत दुरुन एक तरुण मुलगा पाहताना व्हिडीओत दिसत आहे. त्यालाही असे पैसे पडत असताना पाहून मनात पैशांची लालसा तयार होते. आणि पहिला तरुण गेल्यानंतर हा तरुण आपले नशिब आजमविण्यासाठी या झाडा जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्याने पहिल्या तरुणा प्रमाणे झाडाला हात लावून हलविले. आणि पैशांचा पाऊस पडण्याची तो वाट पाहू लागला तर अचानक झाडावरुन कोणीतरी बादलीने पाणी ओतल्याचे व्हिडीओत दिसत आहे. आपली फसवणूक झाली असून आपण प्रॅंकमध्ये फसल्याचे त्याला समजताच पाणी ओतणाऱ्याला तो बोल लावताना दिसत आहे. हे दृश्य पाहून टॅक्सीजवळ उभे असणाऱ्या एका बुजुर्गाला जोराने हसायला येते आणि आपणही हे दृश्य पाहताच हसून मोकळे होत या प्रॅंकला दाद देतो. इस्टाग्रामवर हा प्रॅंकचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.