Oddly Satisfying Viral Video : इंटरनेटवर रोज हजारो व्हिडीओ अपलोड होतात. परंतु, त्यापैकी काही व्हिडीओ खूप व्हायरल होतात. यापैकी काही मनोरंजन करणारे असतात. काही व्हिडीओज पाहून नेटिझन्स विचारात पडतात. शेवटी या व्हिडीओत असं काय होतं की, एवढा व्हायरल झाला. सध्या अशा काही व्हिडीओजने सोशल मीडियात धूम ठोकली आहे. असा काही व्हिडीओजमुळे लोकं मंत्रमुग्ध होतात. तुम्हाला आश्चर्य वाटले की आतापर्यंत २१.२ कोटी वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये काचाच्या काही बॉटल्स संगमरमरच्या सिडींवरून पडताना दाखवलं आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतो. हा व्हिडीओ टिकटॉकवर @rachapotes नावाच्या अकाउंटवरून शेअर केला गेला. त्यावर २१२ मिलीयनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. याशिवाय हा व्हिडीओ दीड लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये फक्त असं लिहीलं आहे. #asmr #asmrsounds #asmrtiktoks
युजर Racha Potes यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे. परंतु, या क्लीपला फारसे व्ह्यूज मिळाले नाहीत. काही व्ह्युवरने यावर वादग्रस्त कमेंट केल्या आहेत. काहींनी असही म्हटलं की, यात काय विशेष आहे ज्याला टिकटॉकवर पाहण्यासाठी लोकं पागल झाले.
ASMR मेंदूला शांत ठेवणारा आवाज असतो. असा आवाज व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐकायला येतो. याला ट्रीगरच्या स्वरूपात ओळखलं जातं. हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रुपात होत असते. एखाद्याला जेवतानाचा त्याचा आवाज चांगला वाटू शकतो.