Video : भारताच्या ‘या’ युवकानं पुश-अप्सचा केला नवा विश्वविक्रम, मोडला स्वत:चाच रेकॉर्ड
थौनाओजम निरंजॉय सिंह (Thounaojam Niranjoy Singh)नं एका मिनिटात 109 फिंगर-टिप पुश-अप्स पूर्ण करून स्वत:चाच 105चा जुना विक्रम मोडला आणि नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवला आहे.
Finger-Tip Push-Ups : मणिपूर(Manipur)मधील एका 24 वर्षीय तरुणानं एका मिनिटात सर्वाधिक फिंगर टिप पुश-अप्स करण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवला आहे. थौनाओजम निरंजॉय सिंह (Thounaojam Niranjoy Singh)नं एका मिनिटात 109 फिंगर-टिप पुश-अप्स पूर्ण करून स्वत:चाच 105चा जुना विक्रम मोडला. एएनआयच्या एका वृत्तानुसार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न अझ्टेक स्पोर्ट्स मणिपूर(Aztecs Sports Manipur)नं इंफाळमधल्या अझ्टेक फाइट स्टुडिओ(Aztecs fight studio)मध्ये आयोजित केला होता.
किरेन रिजिजूंनी केलं ट्विट
एएनआयनं ट्विटरवर रेकॉर्ड ब्रेकिंगच्या प्रयत्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘मणिपूरच्या थौनाओजम निरंजॉय सिंहनं गेल्या आठवड्यात एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (फिंगर टिप्स) करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.’ केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिलंय, ‘मणिपुरी तरूण टी निरंजॉय सिंगची अविश्वसनीय शक्ती पाहणं आश्चर्यकारक आहे, ज्यानं एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप्स (बोटांच्या टिपा) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मला त्याच्या यशाचा खूप अभिमान आहे!’
महाराष्ट्रातल्या शरीरसौष्ठवपटूची कामगिरी
अलीकडच्या काळात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेले आणखी एक भारतीय म्हणजे प्रतीक विठ्ठल मोहिते. महाराष्ट्रातल्या मोहिते यांच्या नावावर सर्वात कमी स्पर्धात्मक शरीरसौष्ठवपटू (पुरुष) म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तो 102 सेंटीमीटर (3 फूट आणि 4 इंच) उंच आहे. 2020मध्ये, चेन्नईच्या एका तरुणानं श्वास रोखून आणि पाण्याखाली सहा रुबिक क्यूब्स सोडवून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला.
Amazing to see unbelievable power of Manipuri youth T. Niranjoy Singh who broke the Guinness Book of World Records for most push-ups (finger tips) in one minute ? I’m so proud of his achievement !! pic.twitter.com/r1yT0ePn3f
— Kiren Rijiju (@KirenRijiju) January 22, 2022
2013पासून सोडवतोय रुबिक्स क्यूब्स
इलियाराम सेकरनं हा टास्क अवघ्या 2 मिनिटं 17 सेकंदात पूर्ण केला, त्यानंतर त्याचा रेकॉर्ड पक्का झाला. तो 2013पासून रुबिकचे क्यूब्स सोडवत आहे. तो म्हणाला, की पाण्याखाली दीर्घकाळ राहण्याची माझी क्षमता निर्माण करण्यासाठी मी नियमितपणे योगाभ्यास करतो.