Viral Video: मिड नाइट सेलसाठी मॉलमध्ये किड्या-मुंग्यांसारखी गर्दी! रात्री 12 वाजता एकमेकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसले लोक

केरळच्या(Kerala) के लुलु मॉलमध्ये 50% डिस्काउंट अशी ऑफर ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे हा मिड नाईट सेल ठेवण्यात आला. एवढ्या रात्री कोण खरेदीला येणार असे मॉल मॅनेजमेंटला वाटले. प्रत्यक्षात मात्र, रात्री 12 वाजता ग्राहक सुरक्षा रक्षकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसली. मॉलमध्ये लोकांनी अक्षरश: किड्या-मुंग्यांसारखी गर्दी पहायला मिळाली.

Viral Video: मिड नाइट सेलसाठी मॉलमध्ये किड्या-मुंग्यांसारखी गर्दी! रात्री 12 वाजता एकमेकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसले लोक
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 5:26 PM

सेल मध्ये खरेदी करण्यासाठी संपूर्ण जगभरातील ग्राहक आघाडीवर असतात. मात्र, केरळ मधील नागरीकांना सगळ्यांचाच रेकॉर्ड मोडला आहे. केरळच्या(Kerala) के लुलु मॉलमध्ये (Lulu Mall) मिड नाइट सेल ठेवण्यात आला होता. ही बातमी केरळमध्ये वाऱ्यासारखी पसरली. रात्री 12 वाजता लोक एकमेकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसले. मॉलमधील गर्दी अनियंत्रीत झाली. मॉमधील या तुफान गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

केरळच्या(Kerala) के लुलु मॉलमध्ये 50% डिस्काउंट अशी ऑफर ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे हा मिड नाईट सेल ठेवण्यात आला. एवढ्या रात्री कोण खरेदीला येणार असे मॉल मॅनेजमेंटला वाटले. प्रत्यक्षात मात्र, रात्री 12 वाजता ग्राहक सुरक्षा रक्षकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसली. मॉलमध्ये लोकांनी अक्षरश: किड्या-मुंग्यांसारखी गर्दी पहायला मिळाली.

या सेलमुळे 6 जुलैच्या रात्री 11:59 वाजल्यापासून ते 7 जुलैच्या सकाळी पर्यंत मॉल उघडा होता. 50% डिस्काउंट अर्थात अर्ध्या किंमतीत वस्तु खरेदी करण्यासाठी लोकांनी मॉलमध्ये तुफान गर्दी केली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ मध्ये मॉलमध्ये किड्या-मुंग्यासारखी गर्दी दिसत आहे. मॉमधील ऑटोमॅटिक जिन्यांपासून मोकळ्या पॅसेजमध्येही ग्राहकांच्या न संपणाऱ्या रांगा दिसत आहेत. मॉलचा प्रत्येक काना-कोपरा गर्दीने भरलेला दिसत आहे. या अभूतपूर्व गर्दीला नियंत्रीत करताना मॉलमधील स्टाफच्या नाकी नऊ आले.

सोशल मिडीयावर मॉमधील या गर्दीचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. अनेक जण हे व्हिडिओ शेअर करत आहेत. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. मॉलमध्ये फक्त ऑफर आहे कोणतीही वस्तु फुकट नाही मिळत आहे अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. लोकांच्या कमेंट्सनुसार या मॉमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारचे सेल लागल्याचे दिसून येत आहे. मॉलमधील एका स्टोरने  स्टोरच्या ट्विटर हँडलवरुन याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.  अनेक मॉमध्ये पावसाळ्यात  विविध  प्रकराचे सेल लागतात. मात्र केरळच्या या मिडनाईट सेल ने सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.