Video | झाडाझुडपात लपून बसलेल्या वाघाने हरणावर अचानक केला हल्ला, व्हिडीओ पाहून
Viral Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका वाघाने एका हरणावरती हल्ला केला आहे. हल्ला पाहून अनेकांना धक्का बसला, काही लोकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Shocking Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) झाला आहे. तो व्हिडीओ अनेकांना आवडला आहे, तर अनेकांना आवडलेला नाही. मुळात प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक लोकांना आवडते. प्राण्याचं जंगलातील राहणीमान, त्यांची शिकार करण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. सध्या एका जंगलातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक वाघ (TIGER) हरणाची शिकार करतो. वाघ हरणावरती इतका भयानक हल्ला करतो की, हरणाला हलता सुध्दा येत नाही.
वाघ बिबट्या आणि चिता खतरनाक शिकारीसाठी ओळखला जातो. या तीन प्राण्यांची जंगलात इतकी दहशत आहे, मोठे-मोठे प्राणी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत करतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ज्यांना हा व्हिडीओ आवडला आहे, त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावेळी वाघ नदीच्या किनारी पाणी पीत आहे, त्याचवेळी तिथून हरणाचा एक कळप जात आहे. वाघाला दिसल्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
वाघाचा हल्ला पाहून हरणाचा कळप पळाला
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ आईएफएस अधिकारी धर्मवीर मीणा यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, झुडपे आणि गवताळ प्रदेश हे भक्षक प्राण्यांचे चांगले सहाय्यक आहेत. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, असं कॅप्शन का दिलं आहे. अचानक झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
Bushes and grasslands are great ally for predators.
-WA forward pic.twitter.com/8NS5C0eDwv
— Dharamveer Meena, IFS? (@dharamveerifs) May 12, 2023
वाघाने केली हरणाची शिकार
व्हिडीओमध्ये एक वाघ हरणाची शिकार करीत आहे. हे सगळं पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २६ हजार लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला अनेकांनी समिश्र प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने ‘जो जीता वही सिकंदर’ असे लिहिले आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी याचे वर्णन धक्कादायक व्हिडीओ म्हणून केले आहे.