टाईम ट्रॅव्हल करुन 2090 मधून 2022 मध्ये परत आलाय; 14 ऑगस्टला महा भयंकर प्रलय येणार असल्याचा इशारा
यादरम्यान सोशल मीडियावर अनेक लोक टाईम ट्रॅव्हल केल्याचा दावा करत आहेत. अशाच एका व्यक्तीने टाइम ट्रॅव्हल करून 88 वर्षांनी परत आल्याचा दावा केला आहे. टाईम ट्रॅव्हलची वेळ संपवून परत आलेल्या या व्यक्तीने 14 ऑगस्ट रोजी भयंकर महाप्रलय येणार असल्याचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : टाईम ट्रॅव्हल(Time travel) अर्थात टाईम मशीन मधून प्रवास करत भविष्याचा वेध घेणे किंवा भतकाळात डोकावणे या साऱ्या कल्पना आपण फक्त चित्रपटांमध्ये पाहतो. मात्र एका व्यक्तीने टाईम ट्रॅव्हल केल्याचा दावा केला आहे. टाईम ट्रॅव्हल करून हा व्यक्ती तब्बल 88 वर्ष मागे आला आहे. 2090 मधून हा व्यक्ती थेट 2022 मध्ये परत आलाय. एवढेच नाही तर या व्यक्तीने 14 ऑगस्ट रोजी महाभयंकर प्रलय येणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. या व्यक्तीच्या या दाव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अध्यात्मापासून ते विज्ञानापर्यंत टाईम ट्रॅव्हल नेहमीच चर्चा झाली आहे. अध्यात्मात टाईम ट्रॅव्हल शक्य मानला गेले आहे. तर भविष्यात मनुष्य टाईम ट्रॅव्हल करुन शकतं असा दावा विज्ञान करत आहे. विज्ञानाकडे अद्याप टाईम ट्रॅव्हल करण्याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. अध्यात्मातही असा एकही माणूस नाही ज्याने टाइम ट्रॅव्हल करण्याचा दावा केला आहे. एकूणच, टाईम ट्रॅव्हलबाबत फक्त कल्पनाच पहायला मिळाल्या आहेत.
यादरम्यान सोशल मीडियावर अनेक लोक टाईम ट्रॅव्हल केल्याचा दावा करत आहेत. अशाच एका व्यक्तीने टाइम ट्रॅव्हल करून 88 वर्षांनी परत आल्याचा दावा केला आहे. टाईम ट्रॅव्हलची वेळ संपवून परत आलेल्या या व्यक्तीने 14 ऑगस्ट रोजी भयंकर महाप्रलय येणार असल्याचा इशारा दिला आहे.
2090 च्या प्रवासातून परत आल्याचा दावा
टाइम ट्रॅव्हलरने दावा केला आहे की तो 2090 मधून 2022 या काळात परत आला आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने हा दावा केला आहे. किम विंडेल नेक्स असे या व्यक्तीचे नाव असून, या नावाने बनवलेल्या फेसबुक अकाउंटवरून त्याने हा दावा केला आहे. त्याची पोस्ट फेसबुकवर टाईम ट्रॅव्हल नावाच्या ग्रुपवर शेअर करण्यात आली आहे. ज्याचे सुमारे 30 हजार सदस्य आहेत. नागरीकांना सतर्क करण्यासाठी आपली निवड करण्यात आल्याचा दावा देखील या व्यक्तीने केला आहे.
अमेरिकेला आजवरच्या सर्वात भीषण वादळाचा सामना करावा लागेल!
टाईम ट्रॅव्हलमधून परत आलेल्या या व्यक्तीने आठवड्यात जगात महा प्रलयाचा इशारा दिला आहे. या महा प्रलयात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होणार असल्याचा दावा त्या व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे. त्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, 14 ऑगस्टला अमेरिकेला आतापर्यंतच्या सर्वात भीषण वादळाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होईल. व्यक्तीच्या दाव्यानुसार, वादळामुळे सर्वाधिक नुकसान दक्षिण कॅरोलिनामध्ये होईल.
दक्षिण कॅरोलिनामध्ये 6 चक्रीवादळे
14 ऑगस्ट रोजी दक्षिण कॅरोलिनाला 6 चक्रीवादळे धडकणार असल्याचा दावा एका टाइम ट्रॅव्हलरने केला आहे. ज्याचा वेग ताशी 250 मैल असू शकतो. या वादळांमुळे मोठा विध्वंस होणार असल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. व्यक्तीच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काही लोक या व्यक्तीच्या दाव्याला अफवा म्हणत आहेत, तर काही लोकांनी वेळ प्रवास करणाऱ्या या व्यक्तीच्या दाव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.