Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tipu Sultan : अखेर टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव, तोडले सर्व रेकॉर्ड, किंमतीचा आकडा ऐकून नाही बसणार विश्वास

Tipu Sultan : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या तलवारीचा अखेर लिलाव झाला. ही तलवार भारतात आणण्याचे स्वप्न भंगले. ही तलवार इतक्या कोटींना विक्री झाली, हा आकडा तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.

Tipu Sultan : अखेर टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव, तोडले सर्व रेकॉर्ड, किंमतीचा आकडा ऐकून नाही बसणार विश्वास
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 10:58 AM

नवी दिल्ली : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांची तलवार भारतात आणण्याचे स्वप्न अखेर भंगले. या खास तलवारीचा लिलाव (Tipu Sultan Sword Auction) झाला. या लिलावाने आतापर्यंतच्या लिलावाचे सर्व रेकॉर्ड तोडले. टिपू सुलतान यांच्या शेवटच्या पाडावानंतर इंग्रजांना ही तलवार त्यांच्या शयनगृहात सापडली होती. टिपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात म्हैसूरवर राज्य केले. त्यांच्या तलवारीला ‘सुखेला’ शक्तीचे प्रतीक मानल्या जाते. कर्नाटक राज्यात टिपू सुलतान यांच्यावरुन प्रचंड वादंग पेटविण्यात आले होते. ते हिंदूविरोधी असल्याचा प्रचार करण्यात आला. इंग्रजांविरुद्ध त्यांची लढाई, पारंपारिक शस्त्रांसोबत आधुनिक तंत्राच्या सहायाने भेदक मारा करणारा दारुगोळा त्यांनी वापरला होता. या विधानसभा निवडणुकीत टिपू सुलतान यांच्या नावाचा विखारी प्रचारासाठी वापर झाला.

इतक्या कोटींना झाला लिलाव लंडनमध्ये या आठवड्यात या तलवारीचा लिलाव झाला. इस्लामिक आणि इंडियन आर्ट सेलमध्ये £14 दशलक्षमध्ये लिलाव करण्यात आला. भारतीय रुपयांमध्ये या तलवारीचे मूल्य 143 कोटी रुपये आहेत. म्हणजे 143 कोटी रुपयांना या तलवारीचा लिलाव झाला.

ही तलवार अमूल्य ठेवा टिपू सुलतान यांच्या तलवारीवर नाजूक नक्षी कोरण्यात आली आहे. सुबक आणि रेखीव नकाशीमुळे ही तलवार चर्चेत होती. टिपू सुलतान यांचा पाडाव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने ही तलवार जनरल डेव्हिड बेयर्ड यांना भेट दिली होती. इंग्रजांनी म्हैसून राज्यावर अनेकदा हल्ले केले होते. पण हिंमत्तीने टिपू सुलतानने हे हल्ले परतावले. पण 1799 मधील हल्ल्यात टिपू मारल्या गेला. टिपू सुलतान यांना टाईगर ऑफ म्हैसूर अशा नावाने ओळखल्या जात होते. त्यांच्या खासगी शस्त्रातील या तलवारीची इंग्लंडमध्ये लिलाव झाला. ओलिव्हर व्हाईट यांनी लिलाव केला. ही एक शानदार, जोरदार तलवार आहे. टिपूंच्या अनेक शस्त्रांपैकी हा अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मृत्यूनंतर मिळाली तलवार इस्लामिक आणि भारतीय कला विभागाचे प्रमुख नीमा सागरची यांनी प्रतिक्रिया दिली. या तलवारीला एक विलक्षण इतिहास आणि अतुलनीय कारागिरी आहे. या तलवारीसाठी अनेकांनी बोली लावली. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी हिरारीने सहभाग नोंदवला. त्यांच्यात ही तलवार घेण्यासाठी मोठी चुरस दिसली. इंग्रजांनी श्रीरंगपट्टणम बेचिराख केल्यानंतर ही तलवार टिपू यांच्या खासगी खोलीतून इंग्रजांना मिळाली. इतरही अनेक शस्त्रे इंग्रजांनी हस्तगत केली. टिपू या तलवारीचा वापर करत होते आणि त्यांच्या खास शस्त्रांपैकी ही एक तलवार होती.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.