VIDEO | ओसाड जमिनीतून पाणी काढण्यासाठी महिलांनी केले अप्रतिम काम, मेहनत पाहून लोकांनी केला सलाम
व्हिडीओमध्ये महिला पाण्यासाठी किती संघर्ष करीत आहेत हे पाहायला मिळत आहे. एक बादली भरण्यासाठी महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. हा व्हिडीओ लोकांना बरचं काही शिकवत आहे.
मुंबई : आयुष्यात प्रत्येकाला पाण्याची गरज असते. पाण्याची बचत करण्यासाठी सरकार आणि काही सामाजिक संस्था पुढाकाराने काम करीत आहेत. काही लोकं (VIRAL VIDEO) पाणी इतके जपून वापरतात. कारण त्यांना पाण्याचं महत्त्व माहित आहे. काही लोकं पाणी इतकं वापरतात की, त्यांना पाण्याचा अर्थ समजत नाही. अनेक शहरात पाण्याची अजिबात कमतरता नाही. काही ठिकाणं अशी आहेत की, तिथं पाण्यासाठी लोकांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. आज सुध्दा महिला कित्येक किलोमीटर पायपीट करुन पाणी आणतात. सध्या एक व्हिडीओ (TRENDING VIDEO) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला जुगाड (JUGAAD) करुन पाणी काढत आहे.
व्हिडीओमध्ये महिला पाण्यासाठी किती संघर्ष करीत आहेत, हे पाहायला मिळत आहे. ट्विटरवरती व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडीओ अनेकदा पाहिला आहे, त्याचबरोबर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ओसाड जमिनीतून दोन महिला पाणी काढत आहे. विशेष म्हणजे त्या महिलांनी पाणी काढण्यासाठी देशी जुगाड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये महिला, कशा पद्धतीने प्लास्टीकच्या पाईपमधून जमीनीच्या आतून पाणी काढत आहेत.
पाण्यासाठी मोठा संघर्ष
पाण्यासाठीचा संघर्ष या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. महिलांना फक्त एक बादली भरण्यासाठी किती मेहनत करावी लागत आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांसाठी धडा आहे. हा व्हिडीओ फक्त ३२ सेकंदाचा आहे. पाईपमधून त्या महिला पाणी बाहेर काढत आहेत. त्या महिलांनी त्या पाईपला एका दोरीने बांधलं आहे. दोन्ही महिला त्या पाईपला खेचत आहेत.
Some places in the world……while you complain!pic.twitter.com/4OGKylC18y
— Figen (@TheFigen_) June 6, 2023
3 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला
त्या व्हिडीओला आतापर्यंत 3.4 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. 60 हजार पेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केलं आहे. 14 हजार लोकांनी त्या व्हि़डीओ रीट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे त्या व्हिडीओ वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.