Video | रील बनवण्यासाठी मुलींनी चालत्या ट्रेनमध्ये डान्स केला, स्टेप्स पाहून लोक म्हणाले, ‘एवढ्या आत्मविश्वासाची गरज नाही’
VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुली चालत्या ट्रेनमध्ये डान्स करीत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) डान्सचे असंख्य व्हिडीओ येत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. काही लोकं मुद्दाम व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होण्यासाठी कायतरी विचित्र करीत असतात. यामध्ये तरुण आणि तरुणीसुध्दा आघाडीवर आहेत. काही लोकांचे सोशल मीडियावर इतके व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यांना आज डान्सर (dance viral video) म्हणून ओळखलं जातंय. सध्या काही मुलींचा सामूहीक डान्स केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
हा व्हिडीओ वैदेही नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकदम छोटा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुलींचा एक ग्रुप एका ट्रेडिंग गाण्यावर नाचत आहे. त्यामध्ये दोन मुली वेगळ्या नाचत आहेत. तर काही मुलींचा ग्रुप एकत्र नाचत आहे.
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहीलं आहे, ‘भाई माझ्याकडून लोकांच्यासमोर जेवणं सुध्दा केलं जात नाही.’
हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. सांगायचं झालं तर या व्हिडीओ क्लिप विषयी बरंच काही सांगू शकतो. हा व्हिडीओ अनेक लोकांना खटकला आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एक नेटकरी म्हणतो, इतका आत्मविश्वास मला पाहिजे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आता वाटतंय, ट्रेन यांच्या निशाण्यावर आहे.
Bhai mere se train mein logo ke aage khana bhi khaya nhi jata?? pic.twitter.com/esLxk9ymom
— whydahi(Himesh’s version) (@vaidehihihaha) May 4, 2023
सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लोकल आणि बाहेर जाणाऱ्या ट्रेनमधील व्हिडीओ अधिक व्हायरल होत असल्यामुळे तरुण आणि तरुणी ट्रेनमध्ये अधिक व्हिडीओ करीत आहेत. ट्रेन इकडे व्हिडीओ तयार करीत असताना अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.