Jugaad Video : वेळ आणि काम वाचण्यासाठी शेतकऱ्याचा नवा जुगाड, गहू काढणीच्या मशीनला जोडलं…,
समजा, तुम्ही कधी गावाला गेला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की, ज्यावेळी गहू मशिनच्या साहाय्याने कापला जातो. त्यावेळी एका बाजूने गव्हाचा भूसा वेगळा होतो. त्यानंतर तो भूसा शेतकरी वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने वापरतात.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल, हे कोणी सांगू शकत नाही. कधी कोणी हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कोणी जुगाड घरात स्कुटी तयार करीत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण त्या व्हिडीओखाली कमेंट करीत आहेत. त्या व्यक्तीने लोकांचं काम कमी व्हावं आणि वेळ वाचावा यासाठी जुगाड केला आहे. हा जुगाड (Jugaad Video) पाहून तुम्ही सुध्दा विचार करणार एवढं मात्र निश्चित. काही दिवसांपुर्वी शेतात रात्री गहू काढतात लोकांच्या मनोरंजनासाठी एकाने शेतात डीजे लावला होता. तिथं शेतकरी रात्री गहू काढत होते. तो व्हिडीओ लोकांना अधिक आवडला होता. सध्या शेतकऱ्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समजा, तुम्ही कधी गावाला गेला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की, ज्यावेळी गहू मशिनच्या साहाय्याने कापला जातो. त्यावेळी एका बाजूने गव्हाचा भूसा वेगळा होतो. त्यानंतर तो भूसा शेतकरी वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने वापरतात. काही शेतकरी तो भूसा ट्रॅक्टरच्या साहाय्याने दुसरीकडे नेला जातो. त्यामुळे खूप वेळ जातो, आणि काम सुध्दा अधिक लागतं. आता ती मेहनत आणि वेळ वाचवण्यासाठी एक शेतकऱ्याने चांगला जुगाड केला आहे. त्याचबरोबर तो जुगाड लोकांच्या पसंतीला सुध्दा अधिक पडला आहे. भविष्यात अशा पद्धतीचे अनेक जुगाड आपल्याला शेतात पाहायला मिळतील.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेतकऱ्यांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर शेतकरी हा व्हिडीओ अधिक पसंत करीत आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहत असाल की शेतकरी आपला वेळ आणि काम वाचवण्यासाठी कशा पद्धतीने जुगाड करीत आहे. भूसा शेतात पडला जातो. त्यासाठी पु्न्हा वेळ वाया जात होता. पण शेतकऱ्याने डोकं लावलं आणि त्यातून चांगला जुगाड तयार झाला आहे. भूसा बाहेर काढण्यासाठी पाईप लावला आहे, तो पाईट थेट ट्रॅक्टरमध्ये सोडला आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व गव्हाचा भूसा ट्रॅक्टरमध्ये भरला जात आहे. हा जुगाड पाहून लोक अनोख्या प्रतिक्रिया देत शेतकऱ्याचे मनापासून कौतुक करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, हरियाणा भाऊ आहे, काहीही होऊ शकते. या जुगाडबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट मध्ये सांगा.