आज तुम्हाला खूप आनंद होईल… कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून लोकांनी सोशल मीडियावर मजेदार मीम्स शेअर केले
कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर नवनवे मीम्स व्हायरल झाले आहेत. त्यापैकी काही मीम्स असे आहेत की, तुमचा आजचा दिवस एकदम मजेशीर होऊन जाईल आणि तुम्ही दिवसभर हसत राहाल.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election Results 2023) निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कारण तिथं विजय होण्यासाठी मागच्या कित्येक दिवसांपासून भाजप (BJP)आणि काँग्रेसने (CONGRESS) कंबर कसली होती. त्यामुळे निकाल कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. त्याचबरोबर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तिथं अनेक प्रचारसभा घेतल्या. परंतु काल काँग्रेसला लोकांनी मतदान केल्याचं स्पष्ट झालं. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मतदान बहुमत स्पष्ट झाल्यापासून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती नवनवे मीम्स व्हायरल झाले आहेत.
ज्यावेळी निकाल जाहीर झाला, त्यावेळी १३८ सीट काँग्रेसला मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर संपूर्ण कर्नाटक राज्यात लोकांनी सेलिब्रेशन सुरु केलं होतं.
10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पहिला विजय म्हणून शनिवारी चालकेरे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे टी रघुमूर्ती यांना विजयी घोषित करण्यात आले.रघूमुर्ती यांनी जनता दलाचे उमेदवार रवीश कुमार यांचा 16,450 मतांनी पराभव केला.
काल निकालानंतर काँग्रेसला कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे दिल्लीतील विजयाचं सगळं श्रेय राहूल गांधी यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना दिलं. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील लोकांचं त्यांनी आभार देखील मानले आहेत.
I’m invincible
I’m so confident
Yeah, I’m unstoppable today ? #VoteCounting #KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/TAo0XPo6nn
— puspita bose (@PuspitaBose) May 13, 2023
Exclusive picture of BJP headquarter. #VoteCounting pic.twitter.com/KFOF4cAHEb
— Desi Devil (@iDesiDevil) May 13, 2023
After #Karnataka BJP???? Congress ???@RahulGandhi#KarnatakaElectionResults2023 #KarnatakaResults #Congress #CongressForKarnataka pic.twitter.com/SKL8oyTMhq
— ????h_???????????? (@Parbh1_) May 13, 2023
#VoteCounting#CongressWinning150 BJP pic.twitter.com/MhRZsPcAR7
— Raju singh chauhan (@RajuCha54640960) May 13, 2023