मुंबई : सापाचं (Snake Video) नाव ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. साप हा असा प्राणी आहे जो अडचणीच्या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु सापाला सार्वजनिक ठिकाणी पाहणं हे लोकांसाठी एकदम धक्कादायक असतं. सोशल मीडियावर (Social media) मध्यंतरी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन स्कुटरमध्ये एक साप लपून बसला होता. सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ गोव्याचा (goa tourist) असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. गोव्यात एका बीचला काही पर्यटक मजा करीत आहेत. एक साप अचानक झाडीतून बाहेर आला आहे. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पर्यटक भला मोठा असा साप पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. जी व्यक्ती साप पकडीत आहे. त्या व्यक्तीच्या एका हातात एक लोखंडी वस्तू आहे. तर दुसऱ्या हातात सापाची शेपूट आहे. साप अधिक रागात असल्याचं दिसत आहे. ती व्यक्ती ज्यावेळी सापाच्या बाजूला जात आहे. त्यावेळी साप त्या व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करीत आहे. संबंधित व्यक्ती त्या सापाला तिथून बीचच्या बाजूने खेचत आहे. परंतु साप त्या व्यक्तीवरती पुन्हा-पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे.
काहीवेळेला व्यक्ती स्वत: ला वाचवण्यासाठी सापाला तिथचं सोडून दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तिथं असलेला साप कशा पद्धतीने फणा काढतोय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. अखेरीत त्या पर्यटकाने त्या सापाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. सापाला एका बॅगेत टाकताना त्या व्यक्तीला अधिक संघर्ष करायला लागला एवढं मात्र निश्चित आहे.
Huge King Cobra being captured in Goa.
What a hair raising thriller… pic.twitter.com/8QpIXyYpmG— Commander Ashok Bijalwan ?? (@AshTheWiz) April 27, 2023
हा व्हिडीओ कमांडर अशोक बिजलवान यांनी ट्विटरवरती शेअर केला आहे. हे ट्विट करताना गोव्यात विशाल किंग कोबरा असं त्यांनी लिहीलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर 39 हजार लोकांनी त्या व्हिडीओला पाहिलं आहे. लोकं त्या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अगदी सुंदर! इतके मोठे प्राणी अजूनही जंगलात आहेत” दुसर्या नेटकऱ्याने लिहिले की, “वाह! एवढ्या मोठ्या कोब्रासोबत असे करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती धाडसी आहे.”