VIDEO | जंगलात वाघाचे फोटो काढत होते पर्यटक, बघताचं वाघाला राग आला, पर्यटकांवर उडी मारली, मग …
Animal Viral Video | जंगलात गेल्यावर वाघाला पाहून फोटो काढताय, मग तुम्ही हा व्हिडीओ पाहा. पर्यटकांवर काय वेळ आली होती. नशीब चांगलं म्हणून नाहीतर...
मुंबई : जंगलात (Forest) फिरण्यासाठी चारचाकी गाडीतून जात आहात. तर तुम्ही हा व्हि़डीओ नक्की पाहा. एखाद्या वाघाला (Tiger) राग आल्यानंतर तो काय करतो. हा अनुभव काही पर्यटकांना आला आहे, पर्यटक ओरडले आणि प्रचंड घाबरले असल्याचे पाहायला मिळाले आहे. पर्यटकांसाठी हा अत्यंत वाईट प्रसंग होता असं म्हणत आहेत. एका रागीट वाघाने पर्यटकांच्या बाजूने झेप घेतली, त्यावेळी पर्यटक ओरडत असल्याचे पाहायला मिळाले. ज्यावेळी लोकं वाघाला पाहत होते आणि फोटो काढत होते. त्यावेळी हा प्रसंग पाहायला मिळाला आहे. इंडिया टु़डे या ग्रुपने सांगितल्याप्रमाणे, हा व्हिडीओ उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील जिम कॉर्बेट नेशनल पार्क (Jim Corbett National Park) पार्क परिसरातील आहे.
भारतीय वनसेना अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी त्यावर चर्चा सुरु केली आहे. चारचाकी गाडीत बसलेले पर्यटक झुडपात लपून बसलेल्या वाघाकडे पाहत त्याचे फोटो काढत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हे पाहून वाघाला राग येतो आणि तो जोरात गर्जना करतो आणि पर्यटकांवर हल्ला करतो. वन अधिकाऱ्याने लिहीले आहे की, पट्टेदार वाघ चिडला आहे. प्रत्येकवेळी तुमच्या घरात कुणीतरी घुसतंय त्यावेळी तुम्ही काय कराल ?
वाघांना जंगलातं पाहणं अनेकांसाठी एक स्वप्न असतं, तिथं वाघ पाहण्यासाठी अति उत्साह दाखवल्यानंतर काय परिस्थिती होते हे तुम्ही व्हिडीओत पाहा. वाघ पाहत असताना तुमच्या जीवाला धोका देखील असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.
सफारीमध्ये असलेल्या चालकाने धाडसं केलं त्यामुळे वाघाचा हल्ला झाला नाही. नाहीतर वाघाने हल्ला केला असता. वाघाचा राग पाहून अनेकांना घाम फुटला असेल एवढं मात्र नक्की.
Striped monk gets irritated ? What will you do if at every designated hours people crash into your house as their matter of right? pic.twitter.com/4RDCVLWiRR
— Susanta Nanda (@susantananda3) April 26, 2023
वाघ कुणालाही नुकसान न करता जंगलात परतला. वाघाचा हल्ला पाहून अनेकांना घाम फुटला. काही लोकं घाबरुन जोरजोरात ओरडू लागली. प्रत्येकवर्षी वाघांची जणगणना होते. भारतात 2022 मध्ये 3,167 वाघ होते. जाहीर केलेल्या आकड्यानुसार 2006 मध्ये 1,411, 2010 मध्ये 1,706, 2014 मध्ये 2,226, 2018 मध्ये 2,967 आणि 2022 मध्ये 3,167 होती.