Video: कोण म्हणतं, आता ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत नाहीत, आधी मुजोरी, मग लाचखोरी, व्हिडीओ पाहा!

या व्हिडीओमध्ये ट्राफिक पोलीस, ज्या प्रकारे वाहन चालकांना लुटत आहे, त्यावरुन हा भ्रष्टाचार अजूनही थांबलेला नाही हेच दिसतं.

Video: कोण म्हणतं, आता ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत नाहीत, आधी मुजोरी, मग लाचखोरी, व्हिडीओ पाहा!
ट्राफिक हवालदाराचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 3:49 PM

चंद्रपूर: हेल्मेट घातलं नाही, विना परवाना वाहन चालवलं, (Traffic Rules) कागदपत्र नसताना वाहन चालवलं वा कार चालवताना सीटबेल्ट घातला नाही, नागरिक चुकले की, दंड तर भरावाच लागतो. पण हा दंड भरताना जो भ्रष्टाचार होतो, त्याला ऑनलाईन सिस्टीम (Online System) आल्यानंतर आळा बसेल अशी अपेक्षा होती. (Viral Video) पण, आता काहींनी यावरही भारी उपाय काढलेला दिसतो.

सध्या एक असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये ट्राफिक पोलीस, ज्या प्रकारे वाहन चालकांना लुटत आहे, त्यावरुन हा भ्रष्टाचार अजूनही थांबलेला नाही हेच दिसतं. हा व्हिडीओ पैसे देणाऱ्या वाहन चालकानेच त्याच्या मोबईलमध्ये शूट केला आहे.

हा व्हिडीओ चंद्रपुरातील असल्याचं कळतंय. इथं एका रस्त्यावर ट्राफिक हवालदार आपल्या मोबाईलसह उभा आहे. त्याने एक दुचाकीही थांबवलेली दिसतेय. दुचाकी थांबवून नंबर प्लेटचा फोटो घेतला गेला आहे. मात्र फोटो घेतल्यानंतरही हा ट्राफिक पोलीस दुचाकीस्वाराशी डील करताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

हे घडत असतानाच, दुसरा दुचाकीस्वार इथं येतो. या दुचाकीस्वाराने हे सगळं प्रकरण मोबाईलमध्ये शूट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ट्राफीक पोलिसाला याची जराही भनक नाहीय. हा दुचाकीस्वार ट्राफिक पोलिसाच्या हातात काही पैसे देतो, हा पोलीसही पैसे घेतो आणि म्हणतो, जा पुढे.

चिरीमिरी घेतानाचा ट्राफिक पोलीसाचा व्हिडीओ पाहा:

आधी नियम मोडले तर ट्राफिक पोलीस पावती फाडायचे, त्यासाठी कॅश पैसे घेतले जायचे, हे घेताना चिरीमिरी देऊन वाहन चालक मोठ्या दंडातून सुटका तर करुन घ्यायचे. मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हाच थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले.

आधी वाहतूक विभागाचा सगळा कारभार ऑनलाईन झाला, नंतर डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे मोठा भ्रष्टाचार थांबला.

पण, असं असलं तरी ट्राफिक विभागातील काहींची ही चिरीमिरी घ्यायची सवय काही सुटली नाही. त्यामुळेच मोबाईलचा फक्त धाक दाखवून वाहनचालकांकडून चिरीमिरी घेणं सुरुच आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.