Tragic story behind her burqa : देशभरात सध्या हिजाबवरून (Hijab) वाद सुरू आहे. महिलांची यात कुचंबणा होत आहे. तर समाजातही धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यातच तलाकचं (Talaq) एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. मध्यंतरी केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकवर कायदा केला. त्याला काहींनी विरोध केला, मात्र तो कायदा आता अस्तित्वात आहे. हे सगळं असूनही महिलांची अवहेलना कमी होत नाही, हे विविध प्रकरणांवरून दिसून येतंय. एका महिलेचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. यात महिलेला तलाक देऊनच सासरची मंडळी थांबली नाहीत, तर एखाद्या खेळण्याप्रमाणं वागणूक या महिलेला मिळत आहे. न्यूज चॅनेल्सना प्रतिक्रिया देताना तिनं आपली कहाणी सांगितली आहे. विशेष म्हणजे पतीसह, सासरा आणि दीर यांच्याशीही लग्न करण्यास भाग पाडण्यात आलंय. आपली ही करूण कहाणी तिनं सर्वांसमोर मांडलीय.
संबंधित महिला कुठली आहे, हे समजू शकलं नाही. मात्र तिनं न्यूज चॅनेल्सना दिलेल्या बाइटमध्ये म्हटलंय, की तिचा विवाह 2009 साली झाला. दोन वर्ष या महिलेला अपत्य नाही, असा बहाणा करून पतीनं तलाक दिला. त्यानंतर हलाला (तलाक झालेल्या पत्नीशी पुन्हा विवाह) करून परत सासऱ्याशी विवाह करण्यास भाग पाडलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर 2017 साली पुन्हा पतीनं तलाक दिला.
या अशा वागणुकीनं ही महिला पुरती हैराण झाली. 2017 नंतर महिलेच्या घरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींची चर्चा केली. तर त्यांनी यावर अजबच उपाय काढला. त्यांनी दिराशी लग्न करण्याची अट घातली. महिलेचा हा अतोनात छळ हा सहन करण्याच्या पलिकडे होता. मी केवळ माझ्या पतीसाठी आहे, असं तिचं म्हणणं होतं. मात्र सासरच्या मंडळींनी अजब अट घालून तिला घरी घेण्यास नकार दिलाय.
या महिलेनं आता आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडत हलाला आणि तलाकच्या मुद्द्यावर आक्रमक मत मांडलंय. हलाला पद्धतीला विरोध तर केलाच. पण महिलेच्या इच्छेविरूद्ध तलाक होता कामा नये, असंही तिनं म्हटलंय. Vandana T.SH यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ ट्विट केलाय.
Married to her husband > Divorced! > married her to his father> father divorced her > he remarried his wife> divorced! > married her to his brother to be his sis-in-law>Divorced! >he remarried her yet again, and she was his wife a third time. Tragic story behind her burqa. pic.twitter.com/IHI4YYsvDs
— Vandana T.SH ???? (@VanShar1) February 17, 2022