चार पत्र्याच्या घरात घरगुती सामना पेक्षा अधिक पुस्तकं, शेतात मजूरीचं काम करीत असताना केलं वाचनं, आज मुलं आहेत…
सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. त्याचबरोबर लोकं लाईक सुध्दा करतात आणि कमेंट सुध्दा करीत असतात. अभंगराव सुर्यवंशी यांची पोस्ट अधिक व्हायरल झाली आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक पोस्ट व्हायरल (Post Viral) होत असतात. त्यातल्या काही पोस्ट लोकांच्या अधिक आवडीच्या असतात. कारण त्या पोस्टमधून एखादा संदेश दिलेला असतो. अशीचं एक पोस्ट मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने आतापर्यंत किती वाचन केलं असेल हे सुध्दा तुमच्या लक्षात येणार आहे. एका भूमी हीन मजूराची ही कथा आहे. त्याने आतापर्यंत वाचन केलेली पुस्तक 100 वर्ष जुनी आहेत. त्याचबरोबर त्यांनी मजूर काम करीत असताना वाचन करीत तिन्ही मुलांना चांगल शिक्षण (well eduacation) दिलं आहे.
काही पुस्तक 100 वर्ष जुनी आहेत
“मी एक भूमीहीन मजूर आहे, मला पुस्तक वाचण्याचा नाद आहे. माझ्या चार पत्राच्या घरात घरगुती सामना पेक्षा पुस्तक अधिक आहेत. म्हणून मी काही पुस्तक पोत्यात काही लोखंडी संदूकमध्ये आहेत. बाकी एक छोटया आलमारीत आहेत, काही पुस्तक 100 वर्ष जुनी आहेत. मी खूप समाधानी आहे, माझे तिन्ही मुले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, मिळेल ते काम करतात. शेतातील बांधकाम मजूर म्हणून ही काम करतात. श्रम हीच देवता कोणतेही काम माणसाला मोठेपणा मिळवून देते. मी बुद्धाची पंचशीला पाळतो, वाईट दुर्गुनापासून नेहमी दूर आहे.” अशी पोस्ट सोशल मीडियावर आहे.
शेतमजूर म्हणून काम करीत असताना वाचली असंख्य पुस्तकं
ज्यांनी अधिक पुस्तकं वाचली आहेत, त्यांचं नाव अभंगराव सुर्यवंशी आहे. फेसबुकच्या एका ग्रुपवरती पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिक लोकांनी त्यांचं कौतुक देखील केलं आहे. शेतमजूर म्हणून काम करीत असताना वाचली असंख्य पुस्तकं, त्यापैकी काही पुस्तक १०० वर्षे जुनी आहेत.
लोकांनी केलं कौतुक
सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. त्याचबरोबर लोकं लाईक सुध्दा करतात आणि कमेंट सुध्दा करीत असतात. अभंगराव सुर्यवंशी यांची पोस्ट अधिक व्हायरल झाली आहे.